मुखपट्टीचा विसर, नियम पाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

नाशिक : करोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्य़ात निर्बंध शिथिलीकरणाची प्रक्रि या सुरू झाली असून सोमवारपासून दैनंदिन व्यवहार सुरू झाल्याने अर्थचक्रोला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत असतांना बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. सामाजिक अंतर नियम, मुखपट्टीचा विसर पडला. दुसरीकडे, अनेक दिवसांपासून बससेवा बंद असल्याने सुनसान असलेल्या स्थानकांमध्ये तुरळक प्रमाणात वर्दळ पाहण्यास मिळाली.

जिल्ह्य़ात करोना बाधितांची संख्या चार लाखाच्या उंबऱ्यावर असतांना जिल्हा प्रशासनाने महिन्यापूर्वी टाळेबंदी लागू केली. या काळात जीवनावश्यक वगळता बहुतांश दुकाने बंद होती. व्यवसायिक तसेच अन्य घटकांच्या रेटय़ामुळे जिल्हा परिसरात शिथीलीकरणातंर्गत सर्व दुकाने, व्यापारी संकु ले खुली करण्यात आली. सोमवारी दुकाने उघडल्यावर अनेकांचा निम्मा दिवस स्वच्छता करण्यातच गेला.  नऊनंतर ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होण्यास सुरूवात झाली. शहर परिसरातील मुख्य बाजारपेठेसह सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड येथे गर्दी कायम होती.  महिलांनी घरगुती सामान खरेदी करण्यासाठी दुकाने गाठली. रस्त्यावर गर्दी असली तरी दुकांनामध्ये फारशी गर्दी नव्हती. मिसळ, वडापाव यासारख्या खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या गाडय़ांवर तसेच खाद्यगृहे गजबजली. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासह ठक्कर बाजार स्थानकात बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा प्रवासी दिसले. जिल्ह्य़ातून बससेवा सुरू झाली असली तरी नागरिकांना अद्याप फारशी माहिती नसल्याने पहिल्या दिवशी स्थानकांमध्ये वर्दळ कमीच राहिली. मुंबई, पुणे, उत्तर महाराष्टातील धुळे, जळगाव, नंदुरबारच्या दिशेने जाणारे प्रवासी बऱ्यापैकी दिसून आले. सोमवारी दुपारी चापर्यंत १२५ हून अधिक बस फे ऱ्या झाल्याची माहिती वाहतूक विभाग अधिकारी कै लास पाटील यांनी दिली. गर्दीत बहुतेकांना करोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून आले. मुखपट्टी असली तरी ती काहींच्या गळ्यातच अडकविलेली दिसली. खरेदी करताना सामाजिक अंतराकडे दुर्लक्ष झाले. प्रशासनाकडून करोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

दुकान बंद असल्याने घरी बसून हातरुमाल,  लहान मुलांचे कपडे शिवण्याचे काम सुरू के ले. सोमवारी सकाळी लवकरच दुकान उघडले. तीन महिन्यांपासून अपेक्षित आर्थिक उत्पन्न मिळत नाही. प्रशासनाने सर्व दुकाने सुरळीत सुरू करण्यास परवानगी देतांना वेळेची मर्यादा वाढविली आहे. यामुळे लवकरच हे चित्र बदलेल असा विश्वास वाटतो.

– दीपक पाटील (विक्रेता)

एक महिन्याहून अधिक कालावधीपासून दुकान बंद आहे. सोमवारी दुकान सुरू झाल्यावर ग्राहकांनी पादत्राणे खरेदीसाठी येण्यास सुरुवात के ली. आता पावसाळा सुरू होत असल्याने अनेकांनी गमबूट, पावसाळी बूट खरेदीला प्राधान्य दिले.

केशव गोटे (चप्पल विक्रेते)