राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत. राज्यात सत्तेचं नवं समीकरण जुळून येत असताना, नाशिकमध्ये भाजपा आणि मनसे एकत्र आले आहेत. नाशिकमधील महापौर निवडणुकीत मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महापौरपदाची माळ भाजपाच्या गळ्यात पडली आहे. भाजपाचे सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध नाशिक महापौरपदी निवड झाली आहे.तर उपमहापौरपदी भिकुबाई बागल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महत्त्वाचं म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्र येऊनही विजय मिळवू शकले नाहीत. शिवसेनेने भाजपाचे १० नगरसेवक फोडले असल्या कारणाने शिवसेनेचा विजय नक्की मानला जात होता. पण मनसेने भाजपाला साथ दिल्याने तसंच काँग्रेसचे नगरसेवक गळाला लागल्याने भाजपाचा विजय झाला आहे. भाजपाचे बंडखोर नगरसेवकदेखील पुन्हा परत आल्याने भाजपाचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

gadchiroli lok sabha seat, Minister dharamraobaba aatram, Claims, vijay waddetivar will join bjp, waddettiwar denies
विजय वडेट्टीवार यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश! धर्मरावबाबा आत्राम यांच्या दाव्याने खळबळ
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
Samajwadi Party akhilesh yadav
मुरादाबादमध्ये सपाकडून दोन दिवसांत दोन अर्ज; रामपूरमध्ये उमेदवार जाहीर, आणखी एका दावेदाराने वाढवला तणाव

मनसेने बजावला होता व्हीप
मनसेने आपल्या पाचही नगरसेवकांना व्हीप बजावत महापौर निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मतदान करण्याचा आदेश दिला होता. आदेशाचं पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल असंही व्हीपमध्ये सांगण्यात आलं होतं.