नाशिक-मुंबई रेल्वेसेवा खोळंबली आहे. खर्डीमध्ये मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने नाशिक-मुंबई रेल्वेसेवेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावत आहेत.

संध्याकाळी ५.३० ते ६ दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. यानंतर या मालगाडीला दुसरे इंजिन जोडून ती बाजूला करण्यात येईल. मात्र यामध्ये बराचसा वेळ गेल्याने या मार्गावरील एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा झाला आहे.

सेवाग्राम, शताब्दी, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या दोन ते अडीच तास उशिरा धावत आहेत. रात्री ११ पर्यंतच्या एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक संपूर्णपणे कोलमडले आहे.