नाशिकमधील शासकीय विश्रामगृहातील खोली बदलून देण्याच्या कारणावरून व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्ध्याचे खासदार रामदास तडस हे खासगी कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये नगरसेवक गजानन शेलार यांच्याकडे आले होते. तडस यांच्या राहण्याची सोय शासकीय विश्रामगृहात करण्यात आली होती. शासकीय विश्रामगृहातील कौतिक टाकेकर (वय ५६, रा. शिंगवेबहुला, देवळाली कॅम्प) हे गुरुवारी (दि.१३) ड्युटीवर असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास गजानन शेलार त्यांच्या कार्यकर्त्यांसह ‘शिवनेरी’ या शासकीय विश्रामगृहावर आले. खासदार तडस यांना देण्यात आलेली खोली बदलण्यावरुन गजानन शेलार आणि विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. तडस यांना खोली बदलून व्हीव्हीआयपी सूट देण्यात यावा, असा आग्रह शेलार यांनी धरला. त्यानंतर व्यवस्थापक संपत चौधरी, अशोक देवळे व कर्मचारी सुनील बागुल यांना शिवीगाळ केली. मुख्यमंत्री, राज्यपाल या महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच व्हीव्हीआयपी सूट राखीव असतो, असे कक्षसेवकाने त्यांना सांगितले. त्यामुळे शेलार यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्याने त्याला मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असे कक्षसेवकाने मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गजानन शेलार आणि कार्यकर्त्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता