नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून पळवून नेण्यात आलेल्या दीड वर्षांच्या बालिके चा चौथ्या दिवशी शोध घेण्यात पोलिसांना यश आले. मंगळवारी आईच्या कुशीत बालिका विसावल्यानंतर पोलिसांचेही डोळे ओलावले. सध्या या बालिके वर जिल्हा रुग्णालयातील बाल कक्षात उपचार सुरू आहेत.
पठावे येथील गौरी गौड ही दीड वर्षांची बालिका आई संगिता हिच्यासोबत नाशिकला मावशीला भेटण्यासाठी आली होती. मावशीला शनिवारी प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी संगीताने गौरीला सोबत घेत जिल्हा रुग्णालय गाठले. जिल्हा रुग्णालय करोना रुग्णालय असल्याने तसेच प्रसूती काळात होणारी धावपळ पाहता संगीताने गौरीला प्रसुती कक्षाच्या आवारात उभ्या असलेल्या एका व्यक्तीजवळ ठेवले.
त्या व्यक्तीला गौरीकडे लक्ष देण्यास सांगून त्या दवाखान्यात गेल्या. दुपारी दोनच्या सुमारास त्या बाहेर आल्या असता संबंधित व्यक्ती आणि गौरी दोघेही जागेवर नसल्याचे पाहून त्या सैरभैर झाल्या. रुग्णालयाच्या आवारातून बालिका बेपत्ता झाल्याने रुग्णालयाने सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासले असता एक व्यक्ती बालिके ला घेऊन जात असल्याचे दिसले. गौरीला पळवून नेण्यात आल्याचा संगिता यांनी धसका घेत अन्नपाणी सोडले.
बालिेके चे अपहरण करणाऱ्या संबंधितांचे छायाचित्र पोलिसांकडून ठिकठिकाणी लावण्यात आले. समाजमाध्यमाव्दारेही संबंधित व्यक्ती दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. सरकारवाडा पोलीस ठाण्यात या विषयी तक्रोर दाखल झाल्यानंतर तपास सुरू झाला. सोमवापर्यंत बालिका न सापडल्याने पोलिसांवर टीका होऊ लागली होती. संगीता यांचे गौरीवाचून होत असलेले हाल पाहून पोलीसही हेलावले. मंगळवारी सकाळी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून एक वृध्द व्यक्ती एका बालिके ला पायी घेऊन जात असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला हटकले असता त्याच्यासोबतची बालिका रुग्णालयातून पळविलेली गौरीच असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी अपहरणकर्ता आणि गौरीला ताब्यात घेतले. पोलिसांनी संबंधिताची चौकशी के ली असता त्याने माणिक सुरेश काळे अशी ओळख सांगितली. फु लेनगर झोपडपट्टीत राहत असून कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करत असल्याची माहिती त्याने दिली. जगण्याचा एकमेव आधार असलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याने या बालिके ला पळविल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. गौरीला पळविल्यानंतर तिला फु लेनगर येथील घरी आणले. तिला सातत्याने खोकला येत असल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन येत असल्याचे काळे याने सांगितले. पोलिसांनी गौरीला तिची आई संगीता यांच्या ताब्यात दिले. सध्या गौरीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:01 am