चारूशीला कुलकर्णी

पुरातत्त्व विभागाचा विचार; पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

साहित्य, संस्कृती या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील फाळके स्मारकातील प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात लवकरच स्मरण वस्तूंचे विक्री केंद्र (सुव्हेनिअर शॉप) सुरू करण्यात येणार आहे. तथापि, फारसे पर्यटक, इतिहासप्रेमी येत नसल्याने तिथे काम करण्यास विक्रेत्यांची नाराजी आहे. या पाश्र्वभूमीवर प्रादेशिक वस्तुसंग्रहालय मूळ वास्तूत म्हणजेच सरकारवाडय़ात स्थलांतरित करण्याचा विचार पुरातत्त्व विभागाने सुरू केला आहे.

गड-किल्ले, प्राचीन वास्तू, वस्तू, नाणी, पत्रव्यवहार, शस्त्रे हा ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा सांगणारा ठेवा नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यात वस्तुसंग्रहालय महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. वस्तू संग्रहालय, पर्यटक तसेच इतिहासप्रेमींची आवड यांची सांगड घालण्यासाठी राज्य शासनाने ‘स्मरण वस्तूंचे विक्री केंद्र’ ही अनोखी संकल्पना मांडली आहे. संग्रहालय पाहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही पर्यटक येतात. हे लक्षात घेत त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्याची आठवण म्हणून स्मरणवस्तू तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यात पर्यटकांसाठी त्या त्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मूर्ती, नाणे, शस्त्रे अशा वास्तू आणि वस्तूंची प्रतिकृती तयार करत विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. या प्रतिकृती, स्मारकांची चित्रे, मग, पेपरवेट आदींच्या स्वरूपात असतील. ही योजना नाशिक शहर परिसरातील प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात राबविण्यासाठी पुरातत्त्व विभाग उत्सुक असला तरी विक्रेत्यांचा तिला फारसा प्रतिसाद नाही. शहरापासून दूर असलेल्या फाळके स्मारकात प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. मुळात ते तेथे आहे याची जाणीव केवळ तेथे लावलेल्या फलकामुळे होते. स्मारकाच्या शेवटच्या कोपऱ्यात वस्तुसंग्रहालय असल्याने बोटावर मोजण्याइतपत मंडळी त्या ठिकाणी पोहचते. दिवसाकाठी काही मोजके पर्यटक वगळता फारसे कोणी तिथे फिरकत नाही. खरेदीदार नसल्याने विक्रेते गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रादेशिक वस्तुसंग्रहालय सरकारवाडा परिसरात हलविण्याचा विचार पुरातत्त्व विभाग करत आहे.

गुंतवणुकीस विक्रेते नाखूश

स्मरण वस्तूंच्या विक्री केंद्र योजनेबद्दल काही विक्रेत्यांशी बोलणी सुरू आहे. सुरुवातीला विक्रेत्यांनी विविध प्रतिकृतींचे पाच ते सहा नमुने तयार करून ते आमच्याकडे द्यायचे आहेत. वरिष्ठ स्तरावर त्याची पाहणी करत गुणवत्ता, कलाकुसर पाहता विक्रेत्याची केंद्रासाठी निवड करण्यात येईल. त्या विक्रेत्याशी करार करत त्याला वस्तुसंग्रहालयात वस्तू विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. पण अनेकांनी इतक्या लांब कोण येणार, हा प्रश्न उपस्थित केला आहे.

–  जया वाहणे, प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, अभिरक्षक