चार जणांना अटक

नाशिक : मालेगांव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अपहरण आणि दरोडय़ाच्या गुन्ह्य़ांतील संशयितांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन तासात चार जणांना अटक करण्यात आली. संशयितांना मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नाशिक येथील प्रवीण कदम हा मित्रांसोबत मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथे जेवणासाठी गेला होता. जेवण करून रात्री घरी परतत असताना चारचाकी वाहनातून आलेल्या सात-आठ जणांनी त्याची वाट अडवत मारहाण करून त्याचे अपहरण के ले. तसेच त्याच्या मित्रांकडील सामान लंपास के ले. याबाबत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात प्रवीणचा मित्र अमित पगार आणि त्याच्या आठ साथीदारांनीच प्रवीणचे अपहरण  के ल्याचे उघड झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के . के . पाटील यांनी पथकासह संशयितांचा शोध सुरू केला. पोलिसांना त्र्यंबकेश्वर परिसरातील तळवाडे फाटा येथील हॉटेल शिवस्वप्नपूर्ती  येथे प्रवीण आणि संशयित असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता अमित पगार, प्रणव बोरसे, प्रकाश सोनवणे, कु णाल बागुल (सर्व राहणार नाशिक)  हे संशयित सापडले. पोलिसांकडे त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली. संशयितांबरोबर प्रवीणही सापडला.

प्रवीणच्या सांगण्यावरून एका  प्रायव्हेट लिमिटेड कं पनीत संशयितांच्या नातेवाईकांनी  १० ते १२ लाखांची गुंतवणूक के ली होती. त्यानंतर कं पनी बंद पडली. पैसे मागितले असता प्रवीणने टाळाटाळ के ली. तो निमगावला असल्याची माहिती मिळाल्यावर अपहरण करून त्याच्या घरच्यांकडून २० लाखांची खंडणी मागण्याचा बेत आखून संशयितांनी प्रवीणचे अपहरण के ल्याची माहिती संशयितांच्या चौकशीत  उघड झाली. संशयितांना मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अजून चार जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

प्रणव बोरसे सराईत गुन्हेगार

संशयित प्रणव बोरसे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्य़ात १७ गुन्हे दाखल आहेत. नाशिक शहर परिसरात खुनाच्या आरोपासह अन्य गुन्हे दाखल आहेत. सध्या तो नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर बाहेर आला आहे. प्रकाश सोनवणे, बागूलविरुद्धही अनेक गुन्हे दाखल आहेत.