News Flash

नाशिकचा ‘आय अ‍ॅम ए ऑडिबल’ सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट

ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात शिक्षणासाठी परिस्थितीशी संघर्ष करावा लागला

नाशिकचा ‘आय अ‍ॅम ए ऑडिबल’ सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट
प्रतिनिधिक छायाचित्र

पोर्टब्लेअर आंतरराष्ट्रीय फिल्म फे स्टिव्हल

नाशिक : अंदमानातील पोर्टब्लेअर आंततराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाशिकचे वास्तुविशारद  विजय पवार यांचा आय एम ए ऑडिबल हा लघुपट सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पवार यांना गौरविण्यात आले. दीड वर्षांपासून करोना काळात शाळा बंद झाल्यापासून आणि ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यापासून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आयुष्यात झालेल्या विविध स्थित्यंतरांचे, मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या दुर्गम, ग्रामीण भागातील वैश्विक संघर्षांचे चित्रण पवार यांनी या लघुपटात के ले आहे.

ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात शिक्षणासाठी परिस्थितीशी संघर्ष करावा लागला, झगडावे लागले. याचे यथार्थ चित्रण या लघुपटात येते. करोनाच्या आपत्तीकाळाचा जितका परिणाम औद्योगिक, व्यापार, सामाजिक क्षेत्रांवर झाला. त्यापेक्षा अधिक दूरगामी परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला.

शिक्षण ऑनलाइन झाल्याने सर्वाचाच भ्रमणध्वनी पाहण्याचा वेळ वाढला. मग मिळेल त्या खोलीत, उपलब्ध जागेत, मिळेल त्या साधनांसह एका वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या पद्धतीने शिक्षण सुरू झाले.

शहरात एकीकडे सर्व साधनसुविधा असतांनाही शिक्षणात खंड पडत होता. त्याचवेळी ग्रामीण भागात मूलभूत गरजांसाठी विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू होता. एका भ्रमणध्वनीवर चार—चार मुले शिकत होती. कधी रिचार्जला पैसे नव्हते. तर कुठे चार्जिगसाठी वीज नव्हती. कुठे भ्रमणध्वनीला संपर्कच नाही. अशाही परस्थितीत शिक्षणाची दुर्दम्य इच्छा असल्यामुळे विद्यार्थ्यांची मिळेल त्या साधनसामग्रीसह शिक्षण मिळविण्यासाठी धडपड सुरू होती.

हा संघर्ष फक्त विद्यार्थ्यांंचाच नव्हता तर, शिक्षकही विद्यार्थ्यांंपर्यंत पोहचण्यासाठी धडपडत होते. याच संघर्षांची मूळ गोष्ट या लघुपटाच्या माध्यमातून जगभर पोचविण्यात लेखक-दिग्दर्शक विजय पवार यशस्वी झाले आहेत.  तीन महिन्यात जगभरातल्या १३ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाची

निवड झाली आहे. पोर्ट ब्लेअर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कार मिळवत या लघुपटाने आंतरराष्ट्रीय लघुपटांशी स्पर्धा करुन सर्वोत्कृष्ट लघुपटाचा बहुमान प्राप्त केला.

वैभव नरोटे निर्मित या लघुपटात नाशिकच्या आनंद निकेतन शाळा, निर्मला स्कूलचे विद्यार्थी समिधा गर्दे, कबीर पाटील, चिन्मय कुलकर्णी, माही टक्के, भैरवी साळूंके, स्वानंद जोशी, क्षितिजा रकिबे, युगा कुलकर्णी, जोतिरादित्य पवार, आर्यन, चिन्मय, वासूदेव, आयुष या विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या आहेत. तसेच अजित टक्के, निष्ठा कारखानिस, चारुदत्त नेरकर आणि विजय पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रविण पगारे यांनी छायाचित्रण, आदित्य रहाणे—संकलन, शुभम जोशी— संगीत तर गणेश शिदे, प्रा.संकल्प बागुल यांनी प्रसिद्धीची बाजू सांभाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2021 12:38 am

Web Title: nashik s i am an audible is the best indian short film zws 70
Next Stories
1 ‘पंचवटी’सह प्रवासी रेल्वे गाडय़ांचा वेग वाढणार
2 महापालिका निवडणूक व्यूहरचनेला सुरुवात
3 बोकड विक्रीत लाखो रुपयांची उलाढाल
Just Now!
X