News Flash

नाशिकमधील दुर्दैवी घटना; एकमेकांना वाचवताना पोलिसासह तीन जणांचा बुडून मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले

धरणात पोहायला उतरताना पाण्याचा अंदाज न आल्याने व एकमेकांना वाचवताना बुडून तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. हे तिघेही युवक सिडकोतील असून चार जण सोबत गेले होते . त्यातील एक पाण्यात न उतरल्याने तो वाचला . शनिवारी दुपारच्या सुमारास मयत मंगेश बाळासाहेब बागुल ( वय 32 ) रा.पाथर्डी फाटा , महेश रमेश लाळगे ( वय 32 ) रा.महाकाली चौक , वैभव नाना पवार ( 27 ) रा.उत्तम नगर यांच्यासह गणेश एकनाथ जाधव हे चौघे मित्र वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेले होते . त्यात मंगेश , महेश व वैभव हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले . पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले . हे पाहुन पाण्यात न उतरलेल्या गणेश याने स्थानिक नागरिकांना मदतीसाठी आरडाओरडा केला . त्यानंतर पोहचलेल्या नागरिकांनी तिघांनाही पाण्याच्या बाहेर काढले मात्र तत्पूर्वीच तिघाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता .

घटनेनंतर वाडीव-हे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली . त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृत्यूतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले . या घटनेमुळे सिडको परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे . यातील मंगेश बागुल हा मुंबई पोलीस कर्मचारी होता . त्याच्या पश्चात पत्नी , दोन भाऊ , बहीण , आई वडील आहेत . महेश लाळगे हा खाजगी नोकरी करीत होता . त्याच्या पश्चात पत्नी , एक भाऊ , आई , वडील असा परिवार आहे . तर वैभव पवार इंजिनिअर होता तो एकुलता एक मुलगा होता . त्याच्या पश्चात बहीण , आई वडील असा परिवार होता . प्रतिक्रिया वालदेवी धरणामध्ये पोहण्यास पूर्णतः बंदी आहे . असे असतानाही काही जण विरंगुळा म्हणून याठिकाणी पोहण्याचे धाडस करतात . यापुढे परवानगी न घेता धरणावर प्रवेश मिळणार नसल्याचे वाडीवर्हे पोलिसांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 2:34 pm

Web Title: nashik three friends drowned in dam nck 90
Next Stories
1 नाशिकमध्ये धक्कादायक घटना; आईला कोरोना झाला म्हणून २३ वर्षीय मुलाची आत्महत्या
2 करोना आढावासाठी मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा
3 Maharashtra class 12 results 2020 : नाशिक विभागाचा १२ वी निकाल ८८.८७ टक्के
Just Now!
X