News Flash

नाशिकमध्ये तीन मजली वाडा कोसळला, एकाचा मृत्यू

तांबट गल्लीत एक तीन मजली जुना जीर्ण झालेला वाडा आहे. आज दुपारी एकच्या सुमारास अचानक या वाड्याचे दोन मजले जमीनदोस्त झाले.

नाशिकमध्ये तीन मजली वाडा कोसळला, एकाचा मृत्यू
जुन्या नाशिक भागातील तांबट गल्लीत एक तीन मजली जीर्ण वाडा कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली किमान ४ ते ५ लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(छायाचित्र: मयुर बारगजे)

जुन्या नाशिक भागातील तांबट गल्लीत एक तीन मजली जीर्ण वाडा कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एका तरूणाचा मृत्यू झाला तर चार जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. आज दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बचावपथकाने धाव घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीला त्यांनी एका रहिवाशाला अत्यवस्थ अवस्थेत बाहेर काढले. अग्निशामक दलाचे चार बंब आणि १० ते १५ कर्मचारी बचावकार्यासाठी आले होते.

तांबट गल्लीत एक तीन मजली जुना जीर्ण झालेला वाडा आहे. आज दुपारी एकच्या सुमारास अचानक या वाड्याचे दोन मजले जमीनदोस्त झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४ ते ५ लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2018 4:24 pm

Web Title: nashik three storey old building collapsed 4 to 5 people in danger
Next Stories
1 संजय धारणकर आत्महत्येनंतर सत्ताधाऱ्यांचे मौन
2 महापालिका कामाचा जीवघेणा ताण!
3 आत्महत्या प्रकरण : चिठ्ठीतील हस्ताक्षराची तज्ज्ञांकडून पडताळणी
Just Now!
X