30 May 2020

News Flash

महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्भगृहातून दर्शन बंद

महाशिवरात्रच्या पूर्वसंध्येला  देवस्थान परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आली आहे. 

 

नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी महाशिवरात्रनिमित्त होणारी गर्दी पाहता पहाटे चार ते सात या नेहमीच्या वेळेत गर्भगृहात सोवळे नेसून भाविकांना घेऊ देण्यात येणारे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा पोलिसांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे महाशिवरात्रनिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे गर्भगृह दर्शनाचा भाविकांचा अट्टाहास कसा धोकादायक ठरू शकतो, याकडे लक्ष वेधले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गर्भगृह प्रवेश बंदीचा निर्णय घेतल्याचे समजते.

महाशिवरात्रनिमित्त लाखोंहून अधिक भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी आले  आहेत. महाशिवरात्रच्या पूर्वसंध्येला  देवस्थान परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आली आहे.  दरम्यानन भाविकांना गाभाऱ्याच्या दरवाज्यापासून दर्शन घेता येणार असून  सोबत पूजा साहित्य नेता येईल, अशी माहिती विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी दिली. गर्दी मुळे चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश बंद करण्या संदर्भात कोणतेही आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले नाहीत. परंतु सुटय़ांचा कालावधी लक्षात घेता गर्भगृहात होणारी गर्दी व त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय विचारात घेता या प्रवेशावर नियंत्रण ठेवावे अशा सूचना देवस्थानला आणि पोलीस विभागासही देण्यात आल्या आहेत. मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत अधिकार प्रदान करण्यात आले असून देवस्थानशी समन्वय साधत यथोचित व्यवस्था करून गर्दीचे नियंत्रण करण्यास सांगण्यात आले आहे.  नागरिकांनी या संदर्भात देवस्थान व प्रशासनाला सहकार्य करावे.

-जिल्हाधिकारी सुरज मांढरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 12:54 am

Web Title: nashik trimbakeshwar temple mahashivratri visitation closed akp 94
Next Stories
1 पाणीटंचाईच्या संकटापासून मुक्तता
2 महापालिका आयुक्तांवर पुन्हा माफी मागण्याची वेळ
3 कोवळी पानगळ थांबेना..!
Just Now!
X