22 September 2020

News Flash

सीबीएससी टेटे स्पर्धेत नाशिकच्या दोघांना कांस्य

राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत येथील सिम्बोयसीस शाळेच्या तिघांनी कांस्यपदक मिळविले.

सीबीएससी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदकाचे मानकरी ठरलेले नाशिक येथील नचिकेत गंगाखेडकर, श्रेया मुथ्थुकुमार.

सीबीएससी शाळांसाठी वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत येथील सिम्बोयसीस शाळेच्या तिघांनी कांस्यपदक मिळविले.
महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा-नगर-हवेली आणि दीव-दमण या पाच राज्यांतील सीबीएससी शाळांच्या विद्याथ्र्योंसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा सांघिक व एकेरी या दोन प्रकारात घेण्यात आल्या. मुलांचे ३२ तर मुलींचे १६ संघ सहभागी झाले होते. एकेरीमध्ये १७ वर्षांखालील गटात नचिकेत गंगाखेडकर तर १९ वर्षांखालील गटात श्रेया मुथ्थुकुमार यांनी तिसरे स्थान मिळवित कांस्यपदकाची कमाई केली.
हे विद्यार्थी शिवसत्य क्रीडा मंडळात शशांक वझे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. त्यांच्या या यशाबद्दल सिम्बॉयसिस शाळेच्या मुख्याध्यापिका सुरिंदर सबरवाल, को-ऑड्रिनेटर सी. आर. पाटील, क्रीडा प्रशिक्षक बी. डी. पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

मानस धामणे, सोनाली पाटील विजेते
पुण्याचा मानस धामणे आणि कोल्हापूरची सोनाली पाटील यांनी जिल्हा लॉनटेनिस संघटनेच्या वतीने नाशिक येथील डिसोझा कॉलनीतील टेनिस कोर्टवर आयोजित १० वर्षांआतील कनिष्ठ राज्य मानांकन स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील ६३ खेळाडुंनी सहभाग घेतला. मुलांच्या अंतीम सामन्यात चौथे मानांकन मिळालेल्या मानस धामणेने पुण्याच्याच व्दितीय मानांकित अन्शुल सातववर ४-०, ३-४, ५-३ अशी मात केली. मुलींच्या अंतीम सामन्यात प्रथम मानांकित कोल्हापूरच्या सोनाली पाटीलने व्दितीय मानांकित पुण्याच्या मधुरिमा सावंतचा ४-०. ४-२ असा सहज पराभव केला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्य संघटनेचे सहसचिव नाशिकचे राजीव देशपांडे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व स्पर्धा प्रमुख सत्यजीत पाटील, सचिव जितेंद्र सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. विजय थेटे यांनी केले. आभार स्पर्धा निरीक्षक आदित्य राव यांनी मानले.

कनिष्ट व्हॉलीबॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाटी ‘बिटको’ पात्र
नाशिकरोड येथील बिटको कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींनी नंदुरबार येथे आयोजित १९ वर्षांआतील विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या संघाने पहिल्या फेरीत धुळे ग्रामीण संघावर विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. या फेरीत नंदुरबार ग्रामीणवर विजय मिळवून अंतीम फेरीत प्रवेश केला. मालेगाव संघाला (नाशिक ग्रामीण) पराभूत करून विजेतेपद मिळविले. हा संघ ३० ऑक्टोबर रोजी गोंदिया येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघात अक्षदा वाईकर, भाग्यश्री सोनवणे, अक्षदा अहिरे, भाग्यश्री झोपे, ऋतुजा गोसावी, निधी विश्वकर्मा, रोशनी उगले, मयुरी पवार यांचा समावेश आहे. क्रीडा शिक्षक प्रा. महेश थेटे, प्रा. दिलीप लोंढे, मनोज म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

महाराष्ट्राच्या टेनिस संघात जिताशा शास्त्रीची निवड
नाशिकमधील उदयोन्मुख खेळाडू जिताशा शास्त्रीची ६१ व्या राष्ट्रीय लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १९ वर्षांआतील संघात निवड झाली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या निवड चाचणीत जिताशाने दमदार खेळाचे प्रदर्शन केले. जिताशा मागील वर्षीही महाराष्ट्राकडून खेळली होती. जिताशा आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस प्रशिक्षक राकेश पाटील यांच्याकडे सातपूर येथील निवेक क्लब येथे नियमित सराव करीत आहे. सध्या ती बी.वाय.के. महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिकत आहे. जिताशाव्यतिरिक्त समीरन केजरीवाल, आस्था दरगुडे, साइ तिवारी, सेरा मेनन या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2015 5:27 am

Web Title: nashik won two bronze medals in cbse tete competition
Next Stories
1 जुन्या नाशिकमध्ये डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसविण्याची मागणी
2 सिन्नरच्या दोघा लाचखोर आरोग्यसेवकांना अटक
3 सादरे आत्महत्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी
Just Now!
X