20 February 2019

News Flash

नाशिकमध्ये शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

सुरेश हरी गावंडे (वय ५९) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील चाचडगाव येथे एका शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. सुरेश हरी गावंडे (वय ५९) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

First Published on October 8, 2018 5:46 pm

Web Title: nashiks farmer committed suicide chachadgaon