नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सोमनाथ दगडू शेंडे (वय ५०) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कैद्याचे नाव आहे. इतर कैद्यांच्या हे लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. शेंडेंने आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न का केला हे समजू शकलेले नाही. पुढील तपास सुरू आहे.

सोमनाथ शेंडेने बुधवारी रात्री बराक क्रमांक चारच्या बाजूला असलेल्या शौचालयात जाऊन पँटच्या नाड्याने गळफास घेतला. परंतु, त्याचवेळी हुसेन मोहम्मद पटेल हा दुसरा कैदी शौचालयात गेला, तेव्हा त्याला हा प्रकार दिसला. त्याने लगेचच इतर कैद्यांना व तुरूंगातील कर्मचाऱ्यांना बोलावून सोमनाथला खाली उतरवले.

दरम्यान, शेंडेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोमनाथ शेंडे याचे मानसिक स्वास्थ बिघडलेले आहे. तो नेहमी तणावात असतो.