17 November 2019

News Flash

नाशिकच्या रोशनी मुर्तडकची भारतीय संघात निवड

१० जुलैपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे

रोम येथे आयोजित जागतिक आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघात नाशिकच्या रोशनी मुर्तडकसह महाराष्ट्राच्या इतर दोघांची निवड झाली आहे. समवेत मार्गदर्शक व्यवस्थापक डॉ. उदय डोंगरे.

रोम येथे आयोजित जागतिक आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात नाशिकच्या रोशनी मुर्तडकसह महाराष्ट्राचे इतर दोघे आणि संघ मार्गदर्शक, व्यवस्थापकांची निवड झाली आहे.

ही स्पर्धा १० जुलैपर्यंत चालणार आहे. स्पर्धेत इपी प्रकारात रोशनी मुर्तडक,फॉइल प्रकारात कोल्हापूरची ज्योती सुतार, तर फॉइल प्रकारात औरंगाबादच्या तुषार आहेरची निवड झाली आहे. संघासमवेत मार्गदर्शक व्यवस्थापक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. उदय डोंगरे यांची निवड झाली आहे. भारतीय तलवारबाजी संघाचे प्रशिक्षण शिबीर अमृतसर येथे झाले.

First Published on July 5, 2019 12:53 am

Web Title: nashiks roshni murtadak fencing championship selection in indian squad abn 97