News Flash

जिल्ह्य़ात करोनाग्रस्तांची संख्या ९२ हजारपार

जिल्ह्य़ात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने ९२ हजाराचा टप्पा पार केला आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने ९२ हजाराचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यतील ८६ हजार २२८  बाधितांवर यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत चार हजार ८७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एक हजार ६६२ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

जिल्ह्य़ात करोनाग्रस्तांची संख्या ९२ हजार ७६४ झाली असून सद्यस्थितीत चार हजार ८७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १६७, चांदवड ४७, सिन्नर ५१७, दिंडोरी १७९, निफाड ५७१, देवळा ४१, नांदगांव ११०, येवला ८८, त्र्यंबकेश्वर ८४, सुरगाणा आठ, पेठ तीन, कळवण ४२, बागलाण ९६, इगतपुरी ८३, मालेगांव ग्रामीण ९२ याप्रमाणे एकूण दोन हजार १२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार ५७०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ९८ तर जिल्ह्यबाहेरील ७८ याप्रमाणे एकूण चार हजार ८७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८९.७१,  नाशिक शहरात ९४, मालेगाव ९३.५८, तर जिल्हा बा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.४० टक्के आहे. नाशिक ग्रामीण ५९६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८६२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६६ आणि जिल्हा बाहेरील ३८ अशा एकूण एक हजार ६६२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 1:15 am

Web Title: nasik corona patients figure is beyond ninety two thousand dd70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लोकसहभागातून मालेगावकरांचा पुढाकार
2 ग्राहक पंचायत की राजकीय संघटना?
3 पल्स पोलिओ मोहीम आव्हानात्मक
Just Now!
X