08 July 2020

News Flash

प्रकाश साळवे, अविनाश चिटणीस, सुनील परमार यांना नाटय़ परिषदेचे पुरस्कार

यंदाच्या अन्य पुरस्कार्थीमध्ये नाशिक येथील तीन रंगकर्मीचा समावेश आहे.

प्रकाश साळवे, अविनाश चिटणीस, सुनील परमार.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या निखिल खडसे स्मृती जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि जीवन गौरव पुरस्कारासाठी चंदू डेग्वेकर यांची निवड झाली आहे. तसेच यंदाच्या अन्य पुरस्कार्थीमध्ये नाशिक येथील तीन रंगकर्मीचा समावेश आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरावर पुरस्कार दिले जातात. शाहीर साबळे पुरस्कार सवरेत्कृष्ट लोककलावंत म्हणून नाशिक येथील प्रकाश साळवे, मराठी नाटककार संघ पुरस्कृत बापूसाहेब टिळक स्मृती पुरस्कार कामगार रंगभूमीवरील सवरेत्कृष्ट लेखक अविनाश तथा बाबा चिटणीस आणि दिलीप बर्वे पुरस्कृत डॉ. न. अ. बर्वे स्मृती पुरस्कार उत्कृष्ट कार्यकर्ता सुनील परमार यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १४ जून रोजी यशवंत नाटय़ मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, उपाध्यक्ष शाहू खैरे यांनी अभिनंदन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2016 1:27 am

Web Title: natya parishad awards
Next Stories
1 गिरणाऱ्यात बारवची स्वच्छता
2 कुसुमाग्रज अभ्यासवृत्तीसाठी गजानन तायडे यांची निवड
3 भाजीपाल्यापेक्षा आंबे स्वस्त भाज्यांचे दर गगनाला
Just Now!
X