भारतीय लष्कराविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली सीबीएसजवळील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.

भागवत यांच्या वक्तव्यामुळे शहीद जवानांसह हुतात्म्यांचाही अपमान झाला असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने म्हटले आहे.

भारतीय लष्कराची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत करून भागवत यांनी अवमान केल्याने लष्कराची त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली.  यावेळी अ‍ॅड. चिन्मय गाडे, योगेश निसाळ, अमोल आव्हाड, शिवराज ओबेरॉय आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.