News Flash

शहरात आज पाणीपुरवठा बंद

महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी दूर करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पाणी गळती थांबविणे, जलवाहिन्या बदलणे, वॉल्व्ह दुरुस्ती अशी वेगवेगळ्या भागांतील कामे एकाच दिवशी हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळी कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येईल.

महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी दूर करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. गंगापूर धरणातून उचललेले पाणी बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. या जलवाहिनीतून सिद्धार्थनगर कालवा येथे मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे. सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी ही गळती थांबविणे आवश्यक आहे. हे काम शनिवारी केले जाणार आहे.

याशिवाय, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रातील ९०० मिलिमीटर जलवाहिनी बदलणे, कोणार्कनगर येथे रायझिंग जोडणी करणे, म्हसरूळ येथील मुख्य वॉल्व्ह बदलणे, कालिका पंपिंग स्टेशन येथील वॉल्व्हची दुरुस्ती, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातही वॉल्व्ह दुरुस्ती, नाशिकरोडच्या पवारवाडी, नवीन नाशिकमधील मुख्य वाहिनीवर जोडणी, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात वाहिनीची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.

या कामामुळे गंगापूर आणि मुकणे धरणातून शहरास होणारा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवला जाणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होईल, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 1:18 am

Web Title: no water supply city akp 94
Next Stories
1 महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘गांधी विचारांचा उत्सव’!
2 मोदींच्या सभेमुळे भाजपच्या आशा उंचावल्या
3 भाजप नगरसेवकांकडून पूरग्रस्तांना नऊ लाखांची मदत
Just Now!
X