23 October 2020

News Flash

जिल्ह्य़ातील करोना बाधितांची संख्या ८६७ वर

नाशिक शहरात करोनाचा तिसरा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

करोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असून गुरूवारी दुपापर्यंत ही संख्या ८६७ पर्यंत गेली आहे. नाशिक शहरात करोनाचा तिसरा बळी गेला. आतापर्यंत  करोनामुक्त असलेल्या देवळा तालुक्यात गुरूवारी पहिला रुग्ण आढळला.

मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात करोनाचा पहिला रुग्ण लासलगाव परिसरात आढळला. त्यानंतर मेच्या चौथ्या आठवडय़ात ही संख्या ८६७ वर पोहोचली आहे. नाशिक शहरात गुरूवारी दुपापर्यंत रुग्णांची संख्या ५१ पर्यंत गेली आहे. गुरूवारी सकाळच्या सत्रात अंबड लिंक रोड येथील ७३ वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला. संबंधित रुग्ण १९ मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात दम लागत असल्यामुळे दाखल झाला होता. एक तासातच त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या घशातील स्त्राव नमुन्याचा अहवाल गुरूवारी आला. वडाळा गावातील करोना संसर्गित रुग्णाच्या कुटूंबातील दोन्ही सदस्यांचे अहवाल सकारात्मक आले. महापालिकेकडून २२ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या १११ वर पोहोचली असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 12:30 am

Web Title: number of corona victims in the district is 867
टॅग Coronavirus
Next Stories
1 डॉक्टरांची कमतरता..बंद वैद्यकीय उपकरणे.. मनुष्यबळाचा अभाव
2 पोलिसांसाठी ‘फिव्हर क्लिनिक’
3 नाशिक, मालेगाव महापालिका लाल क्षेत्रात
Just Now!
X