News Flash

उपचार घेणाऱ्यांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या अधिक

१५८ जणांचा मृत्यू

उपचार घेणाऱ्यांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या अधिक
प्रतिनिधिक छायाचित्र

शहर आणि ग्रामीण भागात करोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असून रविवारी नऊ रुग्णांची भर पडून जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या २६४४ वर पोहचली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १५८३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. १५८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ९०३ रुग्ण उपचार घेत आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

रविवारी दुपारी ६४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील नऊ जणांचे अहवाल सकारात्मक, तर ५४ जणांचे अहवाल नकारात्मक आले. एक आधीच्या बाधित रुग्णाचा अहवाल आहे. बाधित रुग्णांमध्ये शहरातील पाच रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित विंचूर, मोखाडा, इगतपुरी, पिंपळगाव गरूडेश्वर येथील रुग्ण आहेत. नाशिक शहर आणि ग्रामीण भागात करोनाचा आलेख झपाटय़ाने उंचावत आहे. शहराच्या रुग्णसंख्येने ११०० चा टप्पा ओलांडला असून उपचारानंतर ४७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आधी मृत्यू झालेल्या पाच रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहे. करोनामुळे आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५६९ रुग्ण उपचार घेत आहेत. दाट लोकवस्तीचा भागातील अनेक रुग्ण असल्याने समूह संसर्गाचा धोका कायम आहे.

दरम्यान, जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या २६४४ वर पोहचली आहे. सटाणा, इगतपुरी, येवला, चांदवड तालुक्यात आलेख उंचावत आहे. करोनाचा कहर अनुभवणाऱ्या मालेगावात नियंत्रण मिळविण्यात काहीअंशी यश आले. सध्या या शहरात ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २३० वर पोहचली आहे. बाहेरील जिल्ह्य़ातील १४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

माहिती दडवणाऱ्या डॉक्टरविरुध्द गुन्हा

जायखेडा येथील वाहन चालकाला करोनाची लागण झाल्याचे त्याच्या मृत्यूनंतर उघडकीस आले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबियांसह नऊ जण बाधित झाले. त्यानंतर ३४ जण बाधित सापडले. एकाच दिवशी एवढे बाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या ७४ जणांना अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात भरती करण्यात आले. या चालकावर जायखेडा येथील बागूल नामक डॉक्टरने उपचार करूनही माहिती दडवून ठेवल्याचा संशय आहे. बाधिताची माहिती डॉक्टरने प्रशासनाला तत्काळ देणे आवश्यक असतांना त्याने तसे न केल्याने रोगाचा फैलाव झाल्याचा ठपका प्रशासन प्रमुख प्रांत विजयकुमार भांगरे यांनी ठेवला. या प्रकरणी जायखेडा पोलिसांना त्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सटाणा पोलीस ठाण्यातही त्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात त्याने मुखपट्टी न लावता फेरफटका केल्या प्रकरणी प्रशासनाने पोलिसात तक्रार दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:09 am

Web Title: number of coronaviruses is higher than that of those receiving treatment abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नाशिकची मध्यवर्ती बाजारपेठ आठ दिवस बंद
2 Coronavirus : रुग्णसंख्येतील वाढ नाशिककरांसाठी चिंताजनक
3 शिवसेना वर्धापनदिन कार्यक्रमात सुरक्षित अंतराचा फज्जा
Just Now!
X