बेरोजगारीवर मात करण्यासाठी शेतकरी पुत्रांना कृषिपूरक व्यवसायाचा आधार 

पदवीपर्यंत शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने हैराण झालेल्या काही युवकांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाचा आधार घेतला आहे. समाजमाध्यमे केवळ बिघडविण्याचेच काम करतात, अशी ओरड न करता त्यांचा योग्य वापर केल्यास हे माध्यमही फायदेशीर ठरू शकते, हे या युवकांनी दाखवून दिले आहे. अल्पावधीतच त्यांच्या  ‘ऑनलाइन भाजी-फळे’ विक्री व्यवसायाने शहरातील गृहिणींना मदत झालीच, शिवाय शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ झाला आहे. बेरोजगारीच्या विळख्यात सापडलेल्या इतर सुक्षिक्षित युवकांसाठी ही नवीन व्यवसाय संधी असल्याचे मानले जात आहे.

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

अभियांत्रिकीमध्ये पदवी तसेच पदविका शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागासह उत्तर महाराष्ट्रातून काही विद्यार्थी नाशिकमध्ये आले. हे बहुतेक विद्यार्थी शेतीशी संबंधित आहेत. शेती बेभरवशाची झाल्याने महिन्याकाठी दरमहा विशिष्ट रक्कम हातात देणारी नोकरी किंवा वेगळा व्यवसाय धुंडाळण्यासाठी ही मंडळी नाशिकमध्ये आली. शहरातील महाविद्यालयांमध्ये शिकत पदवी तसेच पदविका प्राप्त केली. नोकरीसाठी आवश्यक शिक्षण हातात असूनही काम नसल्याने अनेक जण बेरोजगार होते. धुळे येथून शिक्षणासाठी नाशिकला आलेल्या प्रशांत महाजनने आपली व्यथा मांडली. पदविकेचे शिक्षण घेऊनही हाताला काम नव्हते. नाशिकमध्ये नोकरी शोधत होतो, पण नशीब साथ देत नव्हते, असे त्याने सांगितले. हीच स्थिती ओमप्रकाश देसलेची होती. काही तरी नवीन करायचे हा विचार पक्का होता, पण त्यासाठी भांडवल कुठून आणायचे, असा जेव्हा प्रश्न उभा राहिला, तेव्हा यातील काही मंडळींनी आर्थिक शिदोरी उभी केली. ग्रामीण भागातील या युवकांनी पदवी असूनही कामधंदा नाही म्हणून रडत न बसता वेगळी वाट निवडली. शहरातील नोकरदार महिलांकडे वेळेची असणारी कमतरता लक्षात घेऊन त्यांचा भार हलका करण्यासाठी पर्याय निवडण्यात आला. ज्या शेतीला टाळले, त्याच शेतीच्या आधारावर  ‘ऑनलाइन फळे-भाजीपाला’ विक्रीची संकल्पना मांडली. त्याला सर्वाची साथ लाभली. दोन मालक आणि १५ कर्मचारी अशी स्वतंत्र व्यवस्था उभी राहिली. बाजारपेठेचा अभ्यास करून स्वतचे ‘व्हॉट बकेट’अ‍ॅप तयार केले. या अ‍ॅपवर भाजीपाला तसेच फळांचे दर, अ‍ॅपमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती देण्यात येते.

अ‍ॅप डाऊन लोड करतानाच ग्राहकाची संमती असल्यास त्याच्या खात्यातून काही ठरावीक रक्कम वजा होते. त्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार त्याला घरपोच भाजीपाला दिला जातो. भाजीपाल्याचे दर हे किरकोळ भाजी विक्रेत्यांपेक्षा कमी असून टाकणावळीचे पैसे घेतले जात नाहीत, असे प्रशांतने सांगितले. हे काम करण्यासाठी या सर्व मंडळींना शेतीची कौटुंबिक पार्श्वभूमी कामास आली. शेतीचा अनुभव असल्याने नाशिक जिल्हा परिसरात ज्या ठिकाणी भाजीपाला पिकतो, त्यांच्या शेतात जाऊन मुबलक प्रमाणात भाजी विकत घेण्यात येते. ती घरी आणून स्वच्छ केल्यानंतर ग्राहकांच्या गरजेनुसार बांधणी करणे आणि दुसऱ्या दिवशी घरपोच सेवा देणे या तीन टप्पांत काम चालते. सकाळी सहा ते नऊ या वेळात घरपोच सेवा दिल्यानंतर उरलेल्या वेळेत ही मंडळी दुसरीकडे अर्धवेळ काम करतात. काही पुन्हा अभ्यासात व्यस्त होतात. या निमित्ताने प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले असून दिवसाला पाचशे रुपये सहज मिळतात, असे प्रशांतने सांगितले. अवघ्या तीन ते चार महिन्यांत तीन हजारापेक्षा अधिक नोकरदार नाशिकमधून या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे.