कळवण : अतीवृष्टीमुळे पाच एकर क्षेत्रातील मका पिकाच्या नुकसानीबद्दल कळवण तालुक्यातील पाळे येथील शेतकरी बाळासाहेब पाटील यांना ‘प्रधान मंत्री फसल बिमा योजना’ अंतर्गत भरपाई म्हणून केवळ २५ रुपये बँक खात्यात जमा झाले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा सन्मान राखता येत नसेल, तर थट्टा तरी करू नका, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने तालुका कृषी कार्यालयामार्फत पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला होता. त्याप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पाळे खुर्द येथील शेतकरी पाटील यांची पाच एकर शेती आहे. त्यांनी जुलै २०१९ मध्ये पाच एकर मकासाठी एक हजार सहा रुपये पाच पैसे  हप्ता भरून ‘प्रधान मंत्री फसल बिमा योजना’ अंतर्गत विमा काढला होता. परतीच्या पावसाने त्यांच्या शेतातील पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते.

कृषी विभागामार्फत नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविण्यात आली होती. त्यांच्या शेतातील ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण चाऱ्याचे १०० टक्के नुकसान झाले आहे. विमा कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.

विमा कंपनीने भरपाई म्हणून फक्त २५ रुपये बँक खात्यावर पाठविण्याची कामगिरी केली. तसा संदेश त्यांना भ्रमणध्वनीवर प्राप्त झाला. विमा काढण्यासाठी त्यांना एक हजार सहा रूपयांचा विमा हप्ता आणि कळवण येथे ऑनलाईन कागदपत्रे पाठविण्यासाठी २५० रुपये खर्च आला आहे. असे असतांना नुकसान भरपाई म्हणून केवळ २५ रुपये पाठवून विमा कंपनीने शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टाच केली असल्याची प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

‘प्रधान मंत्री फसल बिमा योजना’ अंतर्गत जोखीमस्तर सर्व पिकासाठी

७० टक्के असा निश्चित करण्यात आला होता. पेरणीपासून काढणीपर्यंतचा  कालावधी नैेसर्गिक भाग, वीज कोसळणे, गारपीट, चRीवादळ, पूर,  दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोग आदींमुळे पिकाच्या उत्पन्नात येणारी घट  तसेच हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकाची पेरणी  किंवा न झाल्यास होणारे नुकसान, काढणीपश्चात नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच योजनेत भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग,  वरई, उडीद , मका, कांदा या पिकांचा समावेश करण्यात आलेला आह

एकरी ३० क्विंटल मका उत्पादन घेतो. यावर्षी अतीवृष्टीमुळे १० क्विंटल उत्पादन झाले आहे. आमचे दिड  ते दोन लाखाचे नुकसान झाले. विमा कंपनीने २५ रूपये नुकसान भरपाई देऊन आमची थट्टा केली आहे. जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. या विरोधात लवकरच आंदोलन करू.

– सौरभ बाळासाहेब पाटील (शेतकरी, पाळे, कळवण)