26 November 2020

News Flash

जिल्ह्य़ात ८१ हजारांहून अधिक जण करोनामुक्त

केवळ सहा हजार ६४८ सक्रिय रुग्ण

केवळ सहा हजार ६४८ सक्रिय रुग्ण

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाग्रस्तांची संख्या ८९ हजार ६३६ वर असताना यापैकी ८१ हजार ३७८ जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या सहा हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत एक हजार ६१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नवरात्र उत्सव काळात मंदिरे बंद आहेत. करोनाचा उद्रेक पाहता उत्सवासाठी लोक गावी परततील, या भीतीने काही गावांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे. आरोग्य तपासणी काही ठिकाणी अनिवार्य करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ३७३, चांदवड १६८, सिन्नर ७१९, दिंडोरी २९७, निफाड ४६५, देवळा ३२, नांदगांव २७८, येवला ११४, त्र्यंबकेश्वर १२४, सुरगाणा १६, पेठ २०, कळवण ११०, बागलाण २१४, इगतपुरी १३९, मालेगांव ग्रामीण १६३ याप्रमाणे एकूण तीन हजार २३२ रुग्णांवर उपचार  सुरू आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार १०३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १७९, तर जिल्ह्याबाहेरील १३४ याप्रमाणे एकूण सहा हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ८९ हजार ६३६ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८५.०३, नाशिक शहरात ९३.३७, मालेगाव ९१.५१ टक्के तर जिल्हा बा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४.७० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९०.७९ इतके आहे. नाशिक ग्रामीण ५६८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८४२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६४ आणि जिल्हा बाहेरील ३६ अशा एकूण एक हजार ६१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 1:31 am

Web Title: over 81 thousand patients recovered from covid 19 zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 महापालिकेच्या विषय समिती नियुक्तीत भलतेच निकष
2 पावसामुळे पिकांचे नुकसान
3 राजकीय पक्षांच्या विद्यार्थी शाखा आंदोलनाच्या रिंगणात
Just Now!
X