News Flash

भातशेती पाण्याखाली

प्रारंभीच्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या के ल्या होत्या.

इगतपुरी तालुक्यात पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे.

उतारावरील पिके  वाहून गेल्याने नुकसान

नाशिक : काही दिवसांपासून के वळ अधूनमधून तुरळक स्वरुपात येणारा पाऊस इगतपुरी, त्र्यंबके श्वर तालुक्यात तीन-चार दिवसांपासून धो धो कोसळू लागल्याने या दोन्ही तालुक्यांमध्ये भातशेती पाण्याखाली गेली आहे. डोंगर उतारावरील रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामीण भागातील जनजीवन विसकळीत झाले आहे.

प्रारंभीच्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या के ल्या होत्या. परंतु, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ असतांना तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार स्वरुपात पाऊस होत असल्याने सर्वत्र तलाव, बंधारे भरण्यास मदत झाली आहे. त्र्यंबके श्वर तालुक्यातील वेळुंजे शिवारात तीन दिवसांपासून सुमारे ५०० एकर भात शेतीत  पाणी साठल्याने पीक धोक्यात आले आहे. त्र्यंबके श्वर तालुक्यातील, वेळुंजे, गणेशगाव, गोरठाण, विनायकनगर, अंबोली इत्यादी ठिकाणी जवळपास ५० टक्के  क्षेत्रावर भात लागवड झाली असून बहुतेक ठिकाणी या लागवडीस वेग आला आहे. त्यातच आता अतीवृष्टीमुळे पेरणीचे काम खोळंबले आहे.

माळरान आणि डोंगर उतारावरील नागली, वरई यांची केलेली लागवड पाण्यामुळे वाहून गेली आहे. त्र्यंबके श्वर तालुक्यात तीन दिवसात हरसूल परिसर आणि घाट माथ्यावर काही ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळल्या. काही ठिकाणी झाडे पडली. खरशेत गावाजवळ दरडीमुळे काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येत रस्त्यावरील भराव हटविला. गणेशगाव रस्त्यावर गुरुवारी सकाळी दरड कोसळली. मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. गणेशगांव येथील सुभाष महाले यांनी पावसामुळे सलग तीन दिवस आपली संपूर्ण भात शेती पाण्याखाली गेल्याने पीक सडण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले. मुळात आधीच भाताची रोपे उन्हामुळे कमकु वत झाले होते. त्यातच पाण्यात अधिक काळ राहिल्याने रोपांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असल्याचे महाले यांनी नमूद के ले.

त्र्यंबके श्वर तालुक्याप्रमाणेच इगतपुरी तालुक्यातही उशिरा पावसाने दमदार सुरुवात के ली असून २४ तासात ९५ मिलीमिटरची नोंद झाली आहे. महिन्याभरापासून पाऊस इगतपुरी तालुक्यातही झाला नव्हता. पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु, गायब झालेला पाऊस आता धो धो कोसळु लागला आहे. संततधार जोरदार पाऊस सुरु असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ज्यांनी भात आवणी के ली नव्हती, त्या शेतकऱ्यांनी भात आवण्यांना सुरुवात के ली आहे. इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावरील घोटी, भावली, मानवेढे, काळुस्ते, वैतरणा या भागात पावसाचा जोर अधिक असल्याने या परिसरातील शेती जलमय झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 1:34 am

Web Title: paddy cultivation under water ssh 93
Next Stories
1 माल वाहतुकीत हमालीची जबाबदारी मालकावर
2 संततधार पण, दमदार पावसाची गरज
3 उद्योग कार्यान्वित राहिल्याने बेकारीचे संकट टळण्यास मदत
Just Now!
X