नाशिक : शहरालगतच्या पांडवलेणी डोंगरावर बुधवारी दुपारी भटकं तीसाठी गेलेली तीन मुले अवघड जागी अडकली. या मुलांनी प्रशासनाकडे मदत मागितल्यानंतर पोलीस, अग्नीशमन विभाग आणि शीघ्र कृती दल यांनी त्यांची सुखरूप सुटका के ली. वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या सदस्यांनी या सुटका मोहिमेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

पांडवलेणी डोंगरावर नेहमीच भटकं तीसाठी मुले जात असतात. चढाईसाठी हौशी मंडळी डोंगराच्या पाठीमागील बाजू निवडतात. हा रस्ता वनविभागाच्या राखीव वनातून जातो. सुरक्षिततेची कोणतीही साधने न घेता भलतेच धाडस करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा अशा मंडळींच्या अंगलट येतो.

पाथर्डी फाटा परिसरातील आयुष तुळसकर (२०), सुमित तुळसकर (१७) आणि समर्थ शिल्लक (१७) या तिघांनी बुधवारी पालकांना बाहेर फिरण्यासाठी निघाल्याचे सांगितले. सकाळी नऊ वाजता त्यांनी अवघड वाटेने डोंगर चढण्यास सुरूवात केली. ही वाट चढण्यासाठी धोकादायक होती. चढताना तिघे अशा टप्प्यावर पोहचले की तिथून त्यांना वर जाणे आणि खाली उतरणेही अशक्य झाले. आपण अडकलो असल्याचे लक्षात आल्यावर तिघांनी त्याच ठिकाणी थांबून भ्रमणध्वनीवरून पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दलाकडे मदत मागितली.  त्यानंतर तत्काळ सिडको अग्निशमन दलाचे जवान पांडवलेण्याच्या पायथ्याशी दाखल झाले. जवानांनी अडकलेल्या मुलांना भोंग्यावरून सूचना देत धीर दिला. दरम्यान, वैनतेय संस्थेचे पथकही सर्व साहित्यासह त्या ठिकाणी पोहचले. डोंगरावर अडकलेल्यांची सुटका करण्याचा अनुभव असलेल्या वैनतेयच्या सदस्यांनी तसेच जवानांनीही दोरखंड आणि जाळी घेऊन मोहिमेला सुरुवात के ली. सर्वांच्या प्रयत्नाने तीनही मुलांना उतरविण्यात आले. इंदिरानगर पोलीस, शीघ्रकृती दल हेही उपस्थित होते. वैनतेच्या बचाव पथकात किरण दाहिजे, रोहित हिवाळे, मानस लोहकरे, निनाद देसले, अपूर्व गायकवाड, सागर पाडेकर, आकाश पवार, विकी मोरे, हेमंत वाघ, राजेश वरखेडे, वसुधा जाधव यांचा समावेश होता.

पालकांनी लक्ष ठेवावे

पांडवलेणी परिसर मोठा आहे. या ठिकाणी कु ठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची गस्त सातत्याने असते. परंतु, पोलिसांचा डोळा चुकवत या ठिकाणी फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. विशेषत:_ युवा वर्गाचे प्रमाण यात अधिक आहे. पालकांना न सांगता मुले-मुली या परिसरात चढाई करतात. यातून काही गैरप्रकार घडल्यास जबाबदार कोण? पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवावे.

-राकेश भामरे (साहाय्यक पोलीस निरीक्षक)