X

जम्परोप स्पर्धेत विक्रमी सहभाग

स्पर्धेत ३० सेकंद गती, तीन मिनिट इंडुरन्स, डबल अंडर, फ्री स्टाईल अशा प्रकारांचा समावेश होता.

जिल्हा जम्परोप संघटनेच्या वतीने कालिका मंदिरच्या सभागृहात आयोजित उपकनिष्ठ आणि कनिष्ठ गटाची जिल्हा स्पर्धा २१० खेळाडूंच्या विक्रमी सहभागाने गाजली.

स्पर्धेत ३० सेकंद गती, तीन मिनिट इंडुरन्स, डबल अंडर, फ्री स्टाईल अशा प्रकारांचा समावेश होता. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुणे कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे, मधुकर देशमुख, कामगार सेनेचे उपाध्यक्ष अंकुश पवार, जम्परोप संघटनेचे उपाध्यक्ष दीपक निकम, सचिव विक्रम दुधारे, चिन्मय देशपांडे  उपस्थित होते.