प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वामी नारायण मैदानावर कार्यक्रम

विद्यार्थ्यांवर देशभक्तीचे संस्कार व्हावे यासाठी येथील झेप कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत येथील स्वामी नारायण मैदानावर आयोजित देशभक्तीपर समूहगान कार्यक्रमात २५ शाळांमधील १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त महेश झगडे, देवयानी फरांदे, जयंत जाधव, सुधीर तांबे या आमदारांसह स्वामीनारायण ट्रस्टचे प्रमुख स्वामी ज्ञानपुराणिक महाराज, महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, माजी महापौर अशोक मुर्तडक आदी उपस्थित होते. या वेळी बग्गा यांनी  उपक्रमाविषयी माहिती दिली. प्रख्यात संगीतकार बाळ देशपांडे यांनी मुलांवर संगीताचे संस्कार करण्यासाठी समूहगीताचा पर्याय निवडला. शैक्षणिक संस्थांमधील मुलांना एकत्र करत त्यांनी समूहगानाच्या अनेक नोंदी केल्या. त्यांच्या निधनाने खंडित झालेल्या परंपरेला पुन्हा सुरुवात करण्यासाठी झेप संस्थेच्या वतीने दोन वर्षांपासून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत समूहगान उपक्रम राबविण्यात येत आहे.

राष्ट्रभक्तीपर गीत या संकल्पनेवर यामध्ये भर दिल्यामुळे विद्यार्थ्यांवर देशभक्तीचे संस्कार रुजतील, असा विश्वास बग्गा यांनी व्यक्त केला. पहिल्या वर्षी सहा हजार मुलांपासून सुरू झालेला हा प्रवास आज १० हजार विद्यार्थ्यांवर आला आहे. विभागीय आयुक्त झगडे यांनी असा उपक्रम राज्यात ठिकठिकाणी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या वेळी श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली १० हजार मुलांनी ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, ‘उठा राष्ट्रवीर हो’,  संत तुकडोजी यांचे ‘सर्वधर्म समभाव’ आणि ‘भारत हमको जान से प्यारा है’ ही राष्ट्रभक्तीपर गीते सादर केली. या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रतिभा धोपावकर यांनी केले.