10 August 2020

News Flash

‘आकार, मूर्त, अमूर्त’ चित्र प्रदर्शनास सुरूवात

चित्र प्रदर्शन लोकाग्रहास्तव १० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे.

येथील जयेश बोरसे, प्रवीण पाटील आणि केतक शेळके या तीन कलावंत मित्रांच्या ‘आकार-मूर्त आणि अमूर्त’ या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगपती अशोक कटारिया यांच्या हस्ते झाले. रसिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या प्रदर्शनाची मुदत १० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रमुख मान्यवरांची तिन्ही चित्रकारांचे कौतुक करत चित्रकलेतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनीही चित्र प्रदर्शनास भेट दिली. निसर्गाचे सौंदर्य अतिशय हुबेहूब टिपले आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सहा जानेवारीपर्यंत खुले असणारे चित्र प्रदर्शन लोकाग्रहास्तव १० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे.  दिपाली नगर येथील साधना आर्ट गॅलरीत सायंकाळी चार ते रात्री आठ या कालावधीत रसिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2016 3:25 am

Web Title: photo exhibition at nashik
टॅग Exhibition,Nashik,Photo
Next Stories
1 आदर्श गाव योजनेसाठी ‘नातीगोती’
2 आगीतून कुटुंबीयांना वाचविण्यात यश
3 मातंग संघाच्या मोर्चामुळे वाहतूक ठप्प
Just Now!
X