बाबाज् थिएटर्सच्या वतीने येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर प्रथम पारितोषिकविजेत्या एकांकिकेसह तीन एकांकिकांचा महोत्सव २२ नोव्हेंबर रोजी येथे आयोजित करण्यात आला आहे.

प्रथम पारितोषिकविजेती एकांकिका अश्व थिएटर, मुंबई प्रस्तुत ‘तो पाऊस आणि टाफेटा’ (ले. तुषार गोडसे), पुण्याची ‘हे गेले’ (ले. योगेश सोमण) आणि नाशिक मयूरी थिएटर्स प्रस्तुत ‘झिकींन झोको’ (ले. निरंजन माळोदे) या एकांकिका या महोत्सवात सादर होणार आहेत. सायंकाळी ५.३० ते ९.३० या वेळेत कालिदास कलामंदिरात हा महोत्सव होणार असून विनामूल्य प्रवेशिका कलामंदिरात प्रयोगाच्या दिवशी एक तास अगोदर उपलब्ध राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सद्गुरू श्रीवेणाभारती महाराज, आ. देवयानी फरांडे, प्रसिद्ध उद्योजक नेमिचंद पोतदार आणि विनोद कपूर हे उपस्थित राहणार आहेत.