News Flash

कवी संजय दोबाडे यांना कैलास पगारे स्मृती पुरस्कार

पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ज्येष्ठ कवी कैलास पगारे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येणाऱ्या प्रथम पुरस्कारासाठी त्र्यंबकेश्वर येथील कवी संजय दोबाडे यांच्या ‘अजून किती काळ?’ या कविता संग्रहाची निवड करण्यात आली आहे.

पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १६ ऑक्टोबर रोजी येथील परशुराम साईखेडकर नाटय़गृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे या कार्यक्रमाचे संयोजन होणार आहे. नाशिककरांनी कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे सचिव राजू नाईक, दत्तू तुपे, राजू देसले आदींनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 1:00 am

Web Title: poet sanjay dobade got award for his work
टॅग : Poet
Next Stories
1 मुंबईत नाशिकचा डंका वाजविणार कोण?
2 पेट्रोल पंप चालकांचा दुष्काळ कराला विरोध; बंदचा इशारा
3 साहित्याचे माध्यमांतर, ही निरंतर चालणारी प्रक्रिया
Just Now!
X