शहर परिसरात अवैध धंद्यांचे पेव फुटले असताना त्या अंतर्गत छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना स्थानिकांनी धक्काबुक्की केल्याची घटना सातपूरच्या महादेव वाडी परिसरात घडली. इतकेच नव्हे तर, महिलेने छेड काढल्याची तक्रार देण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

महादेववाडी परिसरात असलेल्या झोपडीवजा घरात संशयित कृष्णा जाधव, प्रल्हाद साळवे व चित्रा साळवे अवैधरीत्या दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची शहानिशा करण्यासाठी पोलीस पथक या भागात गेले असता हा प्रकार घडला. पोलिसांना पाहून संशयितांनी आरडाओरड करत धक्काबुक्की सुरू केली. अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करत तुम्ही कारवाई केली तर आत्महत्या करू अशी धमकी दिली. महिला संशयिताने ‘तुम्ही माझी छेड काढली’ अशी तक्रार देण्याची धमकी दिली. या घटनाक्रमामुळे पथक चक्रावले. काही काळ कारवाई थांबवत अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागवण्यात आला.

nashik firing at cidco area
नाशिक: सिडकोत गोळीबार, तलवारी फिरवत दहशत; सहा संशयित ताब्यात
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?

संशयित कृष्णा व प्रल्हाद यांना ताब्यात घेण्यात आले. बुधवारी सकाळी संशयित चित्रा साळवेला ताब्यात घेण्यात आले. संशयितांच्या घरात सहा सीलबंद मद्याच्या बाटल्या व अन्य काही सामग्री आढळली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणेचा वचक कमी होत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलीस तर नेहमीच रिक्षाचालक व वाहनधारकांचे लक्ष्य ठरतात. आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळी पोलिसांना जुमानत नसल्याचे या घटनेतून समोर आले.

जिल्ह्य़ात अवैध मद्यसाठा जप्त

जिल्ह्य़ात अवैध मद्य विक्री विरोधात पोलिसांनी दंड थोपटले असून पिंपळगाव बसवंत व वडनेर भैरव परिसरात छापे टाकून २० हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली. पिंपळगाव बसवंत शिवारातील लोणवाडी गावात हॉटेल संदीप डिम्पसच्या बाजूला छापा टाकत पोलिसांनी संशयित अनिरुद्ध सातूला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी विदेशी मद्याच्या १५७ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. तसेच मुंबई-आग्रा महामार्गावर अवैधरीत्या मद्य विक्री करणारा संशयित कैलास वाणी (३५, पिंपळगाव बसवंत) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून ११५ मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. दोघा संशयितांविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडनेर भैरव हद्दीत मालसाने शिवारात छापा टाकत गोविंद आहेर (३२, वडाळीभोई) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून साडे सहा हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.