पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे आवाहन

नाशिक :  मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संभाव्य आंदोलनात सार्वजनिक शांतता भंग होणार नाही आणि सामान्य जनजीवन प्रभावित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी के ले आहे.

रविवारी येथे नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची प्रातिनिधीक बैठक झाली. या बैठकीत झालेल्या ठरावानंतर शहराची कायदा सुव्यवस्था ढासळेल असे आंदोलन मोर्चाकडून होऊ नये यासाठी शहर पोलीस सजग झाले आहेत. त्या अंतर्गत काही समन्वयकांना शहर पोलिसांनी कलम १४९ अन्वये इशारावजा नोटीस दिली होती. या नोटीसमुळे शांततेत आंदोलनाची भूमिका असलेल्या मोर्चात रोष वाढू लागला होता. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आणि मराठा क्रांती मोर्चात अनेक आंदोलनात दिसलेला समन्वय भविष्यात धोक्यात येऊ नये, निर्दोष मराठा तरूणांवर नाहक गुन्हे दाखल होऊन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, या हेतूने मराठा क्रांती मोर्चाचे राजू देसले, करण गायकर. तुषार जगताप, गणेश कदम, आशिष अहिरे आदी समन्वयकांशी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस आयुक्तालयात चर्चा करून क्रांती मोर्चाची भूमिका समजून घेतली.

सर्व समन्वयकांनी मोर्चाच्या आंदोलनाच्या परांपरेला धक्का लागणारी कुठलीही भूमिका जबाबदार समन्वयक म्हणून आम्ही घेणार नाही. उलट कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मराठा तरूणांनी पुढाकार घेतला असल्याचे नमूद के ले. समाज जीवन प्रभावित होऊ नये, हाच मराठा आंदोलनाचा मुख्य कार्यक्र म असल्याचे समन्वयकांनी आयुक्तांना सांगितले.