News Flash

बालकाचा खून करणाऱ्यास पोलीस कोठडी

अरसलान याचा मृतदेह मिल्लत मदरसासमोरील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारत परिसरात आढळला.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : अनैसर्गिक कृत्य करण्याच्या हेतून २० वर्षांच्या युवकाने बालकाचे अपहरण करुन त्याचा खून के ल्याचे मालेगाव येथे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मालेगाव येथील रेहमताबाद परिसरातील शेख सलीम शेख मुसा यांचा १२ वर्षांचा मुलगा अरसलान हा मित्राकडे जातो म्हणून घरातून बाहेर पडला. आझादनगर परिसरात त्याचा मित्र राहतो. सायंकाळी उशीरापर्यंत अरसलान परत न आल्याने पालकांनी त्याचा शोध सुरू के ला. तो सापडत नसल्याने आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रोर दिल्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अरसलान याचा मृतदेह मिल्लत मदरसासमोरील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारत परिसरात आढळला.

आझादनगर पोलिसांनी अरसलान ज्या दिवशी मित्रासोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडला. त्यावेळेचे परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. एका लाल रंगाच्या दुचाकीवर बसून तो गेल्याचे चित्रीकरणात दिसून आले.पोलिसांनी या माहितीच्या आधारे रौनकाबाद परिसरातून संशयित फै जान अख्तर अब्दुल रहेमान याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी के ली असता त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी अरसलान याला सोबत घेतले. मात्र त्याने नकार दिल्याने याबाबत कोणाला कळू नये म्हणून त्याच्या डोक्यात दगड टाकून ठार करीत मृतदेह दुसरीकडे फे कू न दिल्याची कबुली त्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:18 am

Web Title: police custody for child murderer in nashik zws 70
Next Stories
1 शालेय शुल्कवाढ नियंत्रणासाठी विभागीय समिती
2 अनुकंपा तत्वावर १४७ उमेदवारांची महापालिकेत नेमणूक
3 लघुपटाद्वारे शिक्षणातील दरीवर प्रकाशझोत
Just Now!
X