८३ जागांसाठी ३७३ उमेदवार

मालेगाव महानगरपालिकेच्या  ८३ जागांसाठी होणाऱ्या  निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होणार आहे. ११ पक्ष व शंभरहून अधिक अपक्ष असे एकूण ३७३ उमेदवार आपले नशीब अजमावत असून अनेक ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होत असल्याने निवडणुकीविषयी मोठी चुरस निर्माण झाली आहे. मतमोजणी शुक्रवारी होणार आहे.

Speculation markets, Bhandara-Gondia, polls,
मतदानानंतर सट्टा बाजार तेजीत, भंडारा-गोंदियात उमेदवारांना किती मिळतोय भाव, जाणून घ्या….
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live Updates in Marathi
Lok Sabha Election 2024 Phase 1 : विदर्भात ५ जागांसाठी आज मतदान; नक्षलग्रस्त, संवेदनशील भागांत चोख सुरक्षा व्यवस्था
worth rs 4650 crores of drugs seized in the last one and a half months
दीड महिन्यात ४,६५० कोटींची विक्रमी जप्ती
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…

८४ पैकी एक जागा अविरोध झाल्याने २१ प्रभागातील ८३ जागांवर आता ही निवडणूक होत असून त्यासाठी एकूण तीन लाख ९१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. शहरातील वेगवेगळ्या भागातील ११५ इमारतींमध्ये एकूण ५१६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त रवींद्र जगताप यांच्या अधिपत्याखाली सात निवडणूक निर्णय अधिकारी वेगवेगळ्या प्रभागांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या कालावधीत मतदान होईल. प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक या प्रमाणे ५१६ ईव्हीएम यंत्र व अन्य साहित्य मंगळवारी संबंधित पथकांकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच या यंत्रांमध्ये काही बिघाड आढळून आल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून आणखी शंभर यंत्रे राखीव म्हणून ठेवण्यात आली आहेत.

गेल्यावेळी ६३ टक्के मतदान झाले होते. यावेळी निवडणूक काळात ४० ते ४४ अंश या दरम्यान तापमानाचा पारा असला तरी गेल्यावेळपेक्षा यावेळी अधिक मतदान होण्यासाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मतदानाची टक्केवारी वाढविण्याबरोबर बनावट मतदानाला आळा घालण्यासाठी खास खबरदारी घेण्यात आली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि लोकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या असून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.  संवेदनशील असलेल्या ४६ मतदान केंद्रांच्या परिसरातील समाजकंटकांच्या हालचाली टिपण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जात आहे.