काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकाचा मुलगा अजिंक्य चुंबळे याच्या विरोधात महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक शिवाजी चुंबळे यांचा तो मुलगा आहे. संशयित फरार आहे.
अजिंक्यने वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. यातून तिला दिवस राहिले. त्यानंतर संशयिताने तिच्यावर दबाव टाकत खासगी रुग्णालयात पीडितेचा गर्भपात केला. या शारीरिक व मानसिक त्रासाविरोधात पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, संशयित अजिंक्य हादेखील राजकारणात सक्रिय झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, चुंबळे कुटुंबाने हे आरोप फेटाळले असून पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, काही हितशत्रूंकडून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2016 12:49 am