राज्यस्तरीय १०० किमीसाठी खुला गट; ३० सप्टेंबर रोजी आयोजन

सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील मदतकार्यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या येथील चांदीचा गणपती अर्थात रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ न्यास स्थापनेचे शतकी वर्ष पूर्ण करत असल्याने ३० सप्टेंबर रोजी खुल्या गटाची राज्यस्तरीय १०० किलोमीटरची सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय ४० आणि १५ किलोमीटर अंतरासाठीही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Thane Housing Court
ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय
pm modi on yavatmal visit to launch development projects attend public programme
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये; महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
Ranji Trophy Mumbai's Tushar Deshpande and Tanush break the 78 year old record by scoring centuries against Baroda
Ranji Trophy : मुंबईच्या तुषार-तनुषने मोडला ७८ वर्षांपूर्वीचा विक्रम, बडोद्याविरुद्ध खेळताना रचला इतिहास

मंडळाचे सदस्य सायकलपटू राजेंद्र चांदवडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करीत सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने नाशिक जिल्हा सायकलिंग संघटना आणि नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी दिली.

रविवारी सकाळी सहा वाजता रविवार कारंजा येथे स्पर्धकांच्या हस्ते चांदीच्या गणपतीची आरती झाल्यानंतर स्पर्धेला सुरुवात होणार असली तरी मुख्य स्पर्धा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरीपासून सुरू होणार असून १०० किलोमीटरसाठी त्र्यंबकेश्वर- आंबोली घाट- पवार वाडी- रेशीमगाठ लॉन्स हा मार्ग आहे. सात किलोमीटरचा आंबोली घाट जलद पूर्ण करणाऱ्यास ‘घाटांचा राजा’ किताबाने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय ४० किलोमीटरची स्पर्धा पपया नर्सरी ते त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वारमार्गे ग्रेप कौंटी येथे संपेल. १५  किलोमीटरची स्पर्धा पपया नर्सरी ते ग्रेप कौंटी अशी होईल. दहा वर्षांआतील मुलांसाठी चार किलोमीटरची स्पर्धा होईल.

खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार, द्वितीय २१ हजार आणि तृतीय ११ हजार रुपये अशी बक्षिसे राहतील. खुल्या गटात ४० किलोमीटर अंतरात मुलींमध्ये प्रथम क्रमांकासाठी सात हजार, द्वितीय पाच हजार आणि तृतीय तीन हजार रुपये, तर ४० वर्षांवरील आणि ५० वर्षांवरील गटात १५ किलोमीटर अंतरासाठी विजेत्यास नऊ  हजार रुपये दिले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात येणार असून स्पर्धेसाठी सर्व प्रकारच्या सायकली ग्राह्य़ धरण्यात येतील. स्वत:ची सायकल आणि हेल्मेट अत्यावश्यक आहे.

स्पर्धक आपली नोंदणी रविवार कारंजा येथील न्यास कार्यालयात सिद्धिविनायक मंदिर (चांदीचा गणपती), रविवार कारंजा, शिवशक्ती सायकल, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, याशिवाय लूथरा एजन्सी, जुना गंगापूर नाका, ए टू झेड सायकल, गंजमाळ , भांड सायकल, इंदिरानगर येथे करू शकतील. अधिक माहितीसाठी नितीन नागरे (९८२२२९१५५१), प्रकाश चांदवडकर (९७६३०५१२९५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाहेरगावच्या सर्व स्पर्धकांची राहण्याची आणि भोजन व्यवस्था न्यासमार्फत करण्यात येणार असल्याचे स्पर्धा संयोजक नितीन नागरे यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेस सतीश आमले, रवींद्र पाटील, अनिल गोरे, दीपक पवार, पोपट नागपुरे, प्रफुल्ल संचेती, नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते आदी उपस्थित होते.

स्पर्धेसाठी अंतर आणि वयोगट

स्पर्धा १०० किमी- १८ वर्षांपुढील पुरुष गट, ४० किमी- महिला गट, १५ किमी- ४० ते ५० वर्षे पुरुष आणि महिला गट, १५ किमी- ५० वर्षांवरील पुरुष आणि महिला, चार किमी- १० वर्षांआतील मुले-मुली, सात किमी- १२ वर्षांआतील मुले-मुली, १० किमी- १४ वर्षांआतील मुले-मुली, १५ किमी- १७ वर्षांआतील मुले-मुली या गटांमध्ये होणार आहे.