06 March 2021

News Flash

‘सावाना’त पुस्तक शोधण्यात वाचकांची दमछाक

वाचनालयाची सभासद संख्या सर्वसाधारण आणि आजीव मिळून ७१ हजार १३४ इतकी आहे.

सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना)

देवघेव विभाग संगणकीकरणाची प्रक्रिया; त्रास सात दिवसात संपण्याचा दावा

नाशिक : शहराच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेले सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) सध्या कात टाकत आहे. वाचनालयातील ‘पुस्तक देवघेव विभाग पुस्तकांच्या याद्यांचे संगणकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.  या कामांमुळे मात्र, पुस्तक शोधण्यात वाचकांची दमछाक होत आहे.   संगणकीकरणाचे काम सात दिवसात पूर्ण होईल, असा दावा वाचनालयाकडून करुन वाचकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

वाचनालयाची सभासद संख्या सर्वसाधारण आणि आजीव मिळून ७१ हजार १३४ इतकी आहे. बालविभागही आपला विस्तार वाढवत असून ४०० सभासद वाचनालयातून पुस्तके घेऊन जात आहेत. वाचकांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांची वाचनाची अभिरूची जपली जावी यासाठी काही जुनी पुस्तके बाद करत कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित अशा विविध प्रकारातील एक लाख ८७,२१४ पुस्तके, मासिके ही ग्रंथसंपदा वाचनालयाकडे उपलब्ध आहे. यातील ग्रंथसंपदेची देवाण घेवाण करण्यासाठी वाचनालयात सरासरी २०० ते २२५  वाचक वाचनालयात येतात. त्यांच्या सोबत बाल विभागातील ४० ते ५० बालकेही आपल्या आवडीच्या पुस्तकांची शोधाशोध करतात. वाचकांची अभिरूची जपण्यासाठी ग्रंथसंपदा मुबलक स्वरूपात उपलब्ध करून देतांना वाचनालयाने आजवर वेगवेगळे प्रयोग केले आहेत.

काही वर्षांपूर्वी वाचकांनी आपल्याला हव्या त्या लेखकाचे किंवा पुस्तकाचे नाव चिठ्ठीवर लिहून देत सावाना कर्मचाऱ्याकडे दिले जात असे. कर्मचारी ते पुस्तक शोधून देत असे. यात बऱ्याचदा पुस्तक वाचनालयात उपलब्ध नसणे, शोधण्यास विलंब होणे यामुळे वादाचे प्रसंग उद्भवत. हे टाळण्यासाठी काही वर्षांपासून वाचनालयात ‘मुक्तद्वार’ पध्दत सुरू झाली.

जेणेकरून वाचकांना हवे ते पुस्तक ते स्वत शोधु शकतील. मुक्तद्वारचा अर्थ वाचकांनी शब्दश घेत कथा संग्रहात काव्यसंग्रह, चरित्रलेखात संदर्भगं्रथ असा पसारा मांडण्यास सुरूवात केली. यामुळे यादीतील पुस्तक वाचनालयाच्या सुचनेप्रमाणे अपेक्षित ठिकाणी शोधण्यास अन्य वाचकांना अडचणी येऊ लागल्या.

बऱ्याचदा ही पुस्तके दुसऱ्या वाचकांनी नेल्यानेही पुस्तक शोधण्यात बराच वेळ खर्ची होतो. या सर्व पाश्र्वभूमीवर वाचनालयाने मुक्तद्वार पध्दत बंद करत पुस्तक देवाण घेवाण ‘ऑनलाईन’चा पर्याय वाचकांसमोर ठेवला आहे.

‘मुक्तद्वार’ बंद होणार

वाचनालयाने आजवरवाचकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी अनेक प्रयोग केले मात्र त्यात होणारा गोंधळ काही थांबला नाही.  त्यावर उपाय म्हणून सध्या सुरू असलेली मुक्तद्वार पद्धत बंद करुन वाचकांसाठी ऑनलाईन हा पर्याय समोर ठेवला आहे. त्यासाठी पुस्तक, लेखकांच्या नावाच्या याद्यांच्या संगणकीरणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. यामुळे वाचनालयात पुस्तक आहे की नाही, तसेच लेखकांची अन्य पुस्तके याची माहिती मिळेल. संगणकीकरणाचे साधारणत सात ते १५ दिवसात हे काम पूर्ण होईल. वाचकांच्या सोयीनुसार सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करण्यात आल्याने वाचकांना कुठलीही तांत्रिक अडचण येणार नाही, असा दावा सावानाच्या वतीने करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2018 2:02 am

Web Title: readers face problem to find book in sarvajanik vachanalaya nashik
Next Stories
1 बहुतांश तालुके कोरडेच
2 ‘गोटय़ा’मध्ये नाशिकच्या २४२ कलाकारांची फौज
3 बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अभियंत्याला अटक
Just Now!
X