निर्बंध शिथिल होऊनही नाशिककरांसमोर प्रवासाची समस्या कायम

नाशिक : राज्य शासनाने निर्बंध शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू के ल्याने दैनंदिन व्यवहार पूर्ववत होऊ लागले आहेत. राज्य परिवहनची बससेवाही जिल्ह्य़ात सुरू झाली असली तरी शहरात मात्र ती बंदच आहे. महापालिका आणि राज्य परिवहन आपल्या भूमिके वर ठाम असून लवकरच महापालिका शहर बस सेवा सुरू करणार असा दावा करत असल्याने राज्य परिवहनने शहर बस वाहतूक सेवेतून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे

निर्बंध शिथिल होऊनही नाशिककरांसमोरील प्रवासाच्या अडचणी कायम आहेत.

शहराचा विस्तार पाहता राज्य परिवहनने शहर बस सेवा देण्यास तत्परता दर्शविली. परंतु, गेल्या काही वर्षांत महामंडळाला शहर बस वाहतूक सेवेत सातत्याने तोटा येत असल्याने ही बससेवा सुरू ठेवायची की नाही असा प्रष्टद्धr(२२४)न उपस्थित होत असताना महापालिके ने शहर बससेवा ताब्यात घेण्याचा घाट घातला. यावरून वादंग माजले.

महापालिके कडून शहर बससेवेशी संबंधित निविदा, ठेके दार अशी प्रक्रि या पूर्ण के ली जात असताना करोनाचा शिरकाव झाला. प्रवासासह सर्वच व्यवहारांवर निर्बंध आल्याने हा विषय बाजूला पडला. नुकतेच महानगरपालिकेच्या बस सेवेसाठी शून्य ते दोन किलोमीटपर्यंत १० रुपये पूर्ण भाडे तर पाच रुपये अर्धे भाडे तसेच कमाल ५० किलोमीटरच्या प्रवासासाठी ६५ रुपये पूर्ण भाडे तर ३५ रुपये अर्धे भाडे असे तिकीट दर ठेवण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

बस सेवेसाठी मनपा हद्दीसह हद्दीलगतच्या २० किलोमीटपर्यंतच्या परिसरात १४६ मार्गावर टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. महानगर परिवहन महामंडळाने शहर आणि परिसरात एकूण २५० बसद्वारे प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी विविध १४६ मार्गावर टप्पा वाहतुकीस परवाना मिळणे आणि टप्पा दरास मंजुरी मिळणे असे दोन प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्याकडे सादर केले होते. या प्रस्तावावर प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आले. यामुळे महापालिके ची शहर बससेवा लवकरच सुरू होईल असा विश्वास व्यक्त के ला जात आहे.

महापालिके ची बससेवा नक्की कधी सुरु होईल, हे अनिश्चित असताना निर्बंध शिथिल झाले. त्यामुळे शहरात राज्य परिवहन महामंडळाने आपली बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. परंतु, परिवहन महामंडळाने यातून अंग काढून घेतले आहे. यामुळे नागरिकांना शहरांतर्गत प्रवासासाठी खासगी वाहतूक  सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. प्रवाशांची अडचण लक्षात घेता काही ठिकाणी त्यांची आर्थिक लूट होत आहे.

शहर बससेवा त्वरित सुरूहोण्याविषयी अनिश्चितता

शहरात राज्य परिवहन महामंडळाकडून आधी १५० बसच्या माध्यमातून प्रवासी सेवा दिली जात होती. परंतु, त्यात तोटा येत होता. महापालिके शी या संदर्भात पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद न मिळाल्याने महामंडळ शहरात बससेवा सुरू करण्यास उत्सुक नाही. मागील वर्षी टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर काही दिवसांनी प्रवासी बस सेवा सुरू झाली. त्या वेळी ५० बस दिवसभरात शहरातील नाशिकरोड, सातपूर, पंचवटी, सिडको या भागात आठ ते १० फे ऱ्या करत होत्या. परंतु, प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता महापालिके ची बस सेवा सुरू होत असल्याने इतक्यात राज्य परिवहनची शहर बस सेवा सुरू होणार नाही.

– कै लास पाटील (विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ)