स्तनपान न मिळाल्याचा परिणाम

नाशिक : करोनाचा संसर्गाचा राज्यात फै लाव सुरू होताच सतर्क झालेल्या आरोग्य विभागाने करोनाचा विळखा गरोदर माता आणि बाळांना होऊ नये यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न के ले. जिल्ह्य़ात काही गरोदर मातांना करोनाचा संसर्ग झाल्यावर नवजात शिशूंना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून बाळांना काही काळासाठी स्तनपानापासून दूर ठेवण्यात आले होते. या व्यवस्थेचा बाळांमध्ये प्रतिकू ल परिणाम दिसून येत असून बाळांना कु पोषणाचा धोका वाढला आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात करोनाचा विळखा शहराला पडण्यास सुरूवात झाली. त्या वेळी हा धोका गरोदर मातांना अधिक असल्याचे लक्षात घेता नाशिक महानगरपालिका तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने करोनाबाधित गरोदर मातांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला. महापालिके ने जिल्हा रुग्णालयाच्या मदतीने ही सेवा दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयासह मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात करोना बाधित गरोदर मातांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित झाला.

मे २०२० ते जुलै २१ या कालावधीत आतापर्यंत २२३ करोनाबाधित मातांची प्रसूती या कक्षांमध्ये झाली. यामध्ये १४३ माता नैसर्गिकरीत्या प्रसूत झाल्या. तर, ८० मातांची शस्त्रक्रि या करावी लागली. करोनाबाधित मातेपासून बाळांना संसर्ग होण्याचा धोका असल्याने तो टाळण्यासाठी उपाय करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर होते. नवजात शिशूंना स्तनपान मिळणे आवश्यक होते. सरकारी रुग्णालयांमध्ये मातांच्या मनातील भीती दूर करून स्तनदा मातांना नवजात शिशूंना स्तनपान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. खासगी रुग्णालयातही काही नवजात शिशूंना स्तनपान के ले जात होते. परंतु, बहुतांश ठिकाणी करोना संसर्गाच्या भीतीमुळे नवजात शिशूंना स्तनपान करण्यासाठी मातांनी चालढकल केली.

आईला करोना असल्यामुळे अशा बाळांना पहिले २४ तास, महिनाभर दुधाची पावडर, गाई किं वा म्हैस यांचे दूध दिले गेले. परंतु, प्रारंभीच्या काळात बाळांना मातेच्या दुधाची अधिक गरज असते. मातेच्या दुधातून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांची जागा इतर कोणत्याही गोष्टी भरून काढू शकत नसल्याने अशा बाळांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे उघड झाले. हा परिणाम कितपत आहे, हे पुढील वर्षभरात बालकांच्या शारीरिक वाढीवरून कळून येईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

करोनाकाळात काही गरोदर मातांना करोनाचा विळखा पडला. गरोदर मातांपासून नवजात शिशूंना हा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न के ले गेले. या काळात नवजात शिशूचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी स्तनदा मातांना बाळांना स्तनपान करण्यासाठी प्रवृत्त के ले. यापलीकडे बाळाचे आरोग्य लक्षात घेता कांगारू पद्धतीचा अवलंबही करण्यात आला. ज्या बालकांना दुधाची पावडर किं वा बाहेरील दूध दिले गेले, त्यांच्यात कु पोषणास सुरुवात झाली आहे. परंतु, पुढील सहा महिन्यांत याची तीव्रता किती प्रमाणात आहे ते लक्षात येईल.

– डॉ. अनंत पवार (जिल्हा समन्वयक अधिकारी)