News Flash

पिस्तुलाचा धाक दाखवून लूट

साडेपाच तोळे दागिने लुटले. सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज संशयितांनी काढून घेतला.

(संग्रहित छायाचित्र)

चामरलेणीजवळील घटना

नाशिक : म्हसरूळ येथील चामरलेणीच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांना टोळक्याने बेदम मारहाण करीत पिस्तूलचा धाक दाखवित महागडे पाच भ्रमणध्वनी आणि साडेपाच तोळे दागिने लुटले. सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज संशयितांनी काढून घेतला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विजयनगर येथे राहणाऱ्या ब्रज शहा याने तक्रार दिली.  ब्रज हा सिध्दांत शर्मा, मत मजेठिया या मित्रांसोबत पेठ रस्त्यावरील चामरलेणी येथे फिरण्यासाठी गेला होता. चामरलेणीच्या पायथ्याशी ते छायाचित्र काढत असतांना चार संशयित तिथे आले. त्यातील बुटक्या व्यक्तीने पिस्तूल दाखविले. त्याच्यासह इतरांनी शहा आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. जबरदस्तीने सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यातील सोनसाखळी, खिशातील रोकड, पाच भ्रमणध्वनी बळजबरीने काढून घेतले.

सुमारे पावणेदोन  लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ९० हजार रुपयांचे भ्रमणध्वनी आणि दीड हजार रुपयांची रोकड घेऊन संशयितांनी पोबारा केला. अकस्मात घडलेल्या घटनेने युवक धास्तावले. त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल के ला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:46 am

Web Title: robbery at gunpoint incident near chamarleni ssh 93
Next Stories
1 लसीकरण संथपणे
2 रुग्णालयांतील प्राणवायू वापराचे परीक्षण
3 सोने मोडण्यासाठी सराफांची थेट घरपोच सेवा
Just Now!
X