News Flash

साहित्य सावाना दिवाळी अंकास राज्यस्तरीय पुरस्कार

पुरस्काराचे स्वरूप ३७,५०० रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ असे आहे.

साहित्य सावाना दिवाळी अंकास राज्यस्तरीय पुरस्कार
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई मराठी पत्रकार संघ व रामशेठ ठाकूर विकास मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित दिवाळी अंक २०१७ राज्यस्तरीय स्पर्धेत येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेच्या ‘साहित्य सावाना’ ने प्रथम पुरस्कार मिळविला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांच्या उपस्थितीत पनवेल येथे झालेल्या समारंभात संस्थेस सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप ३७,५०० रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ असे आहे. साहित्य सावानाचे संपादक श्रीकांत बेणी, वाचनालयाचे कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके, उपाध्यक्ष किशोर पाठक, साहाय्यक सचिव अ‍ॅड. भानुदास शौचे, सांस्कृतिक कार्यसचिव प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, वसंत खैरनार, बालभवन प्रमुख संजय करंजकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्पर्धेत ४५० दिवाळी अंक सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘हे थेंब अमृताचे’ हे विविध दिवाळी अंकांतील उत्कृष्ट कथांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 3:05 am

Web Title: sahitya savana diwali ank state level award
Next Stories
1 रणजित अकॅडमी, यूएसजी, शाईनिंग स्टार विजेते
2 मुख्यमंत्र्यांचे तुकाराम मुंढेंना अभय, अविश्वास प्रस्ताव मागे
3 अखेर करवाढ मागे
Just Now!
X