17 July 2019

News Flash

मालिकेमुळे संभाजी अनेकांना नव्याने समजले -डॉ. अमोल कोल्हे

संभाजी महाराज नव्या सत्य माहितीने घराघरात पोहोचले याचा मनस्वी आनंद आहे, अशी भावना अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

अमोल कोल्हे

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेमुळे संभाजी ही व्यक्तिरेखा अनेकांना नव्याने समजली. खरे संभाजी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो. संभाजी महाराज नव्या सत्य माहितीने घराघरात पोहोचले याचा मनस्वी आनंद आहे, अशी भावना अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

चांदवड येथे डॉ. कोल्हे यांचा सलादे बाबा कला क्रीडा मंडळ ट्रस्टच्या वतीने तसेच शिरवाडे वणी येथे विविध मंडळांतर्फे डॉ. कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी युवकांशी संवाद साधताना डॉ. कोल्हे यांनी संभाजी महाराज या व्यक्तिमत्त्वाविषयी असलेले समज, गैरसमज या मालिकेने दूर केले हीच या मालिकेची यशस्वीता असल्याचे सांगितले.

सलादे बाबा कला क्रीडा मंडळ ट्रस्टच्या वतीने ट्रस्टच्या वतीने संस्थापक सुरेश सलादे यांनी त्यांचे चांदवड तालुक्याच्या वतीने स्वागत केले. तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची त्यांना माहिती दिली. शिरवाडे वणी येथे वडनेर भैरवमधील युवकांच्या वतीने राहुल पाचोरकर, एकता ग्रुपच्या वतीने अध्यक्ष सुरेश पवार, वडनेर भैरव जगदंब ग्रुपच्या वतीने महेंद्र सलादे, राजमुद्रा ग्रुपच्या वतीने सोनू सगर यांनी डॉ. कोल्हे यांचे स्वागत केले. वडनेर भैरवचे युवा शेतकरी प्रमोद जाधव यांनी आपल्या शेतातील द्राक्षे डॉ. कोल्हे यांना भेट म्हणून दिली.

First Published on March 15, 2019 1:09 am

Web Title: sambhaji got a new idea because of the series dr amol kollhe