News Flash

संभाजीराजे भोसले यांनी आंदोलन पुढे ढकलावे

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजात प्रचंड असंतोष आहे.

संग्रहीत

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन

नाशिक : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजात प्रचंड असंतोष आहे. राज्यात २३ संघटना या प्रश्नावर काम करीत असताना वेगळी भूमिका का, असा प्रश्न करीत या सर्वाना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

या अनुषंगाने छत्रपती संभाजी राजे, विनायक मेटे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. तूर्तास संभाजी राजे यांनी आंदोलन पुढे ढकलावे असे आवाहन त्यांनी केले. मराठा आरक्षणाच्या विषयावर सोमवारी विखे पाटील यांनी जिल्ह्यतील मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली. दोन दिवसीय दौऱ्यात संबंधितांची मते ते जाणून घेणार आहेत. शहरात झालेल्या बैठकीवेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी प्रयत्नरत असणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत आहे. लवकरच या संदर्भात संभाजी राजे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत.

आपली समन्वयाची भूमिका आहे. कोणत्याही आंदोलनाचे नेतृत्व सामूदायिक असावे. संभाजी महाराजांनी राज्यातील संघटनांच्या संयुक्त बैठकीला उपस्थित रहावे आणि त्यांनी आंदोलन पुढे ढकलावे, अशी विनंती करणार असल्याचे विखे यांनी नमूद केले.

समाजातील नेत्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा

पदोन्नती, आरक्षणाच्या मुद्यावर समाजातील नेत्यांनी तात्काळ राजीनामा देणे आवश्यक असल्याकडे विखे-पाटील यांनी  लक्ष वेधले. समाजाचा दबाव वाढला की, नेते मंडळी पुढे येतील. प्रथम सर्व संघटनांना आणि नंतर खासदार-आमदारांना एकत्र आणले  जाणार आहे. बैठकीत आंदोलनाच्या पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 1:01 am

Web Title: sambhaji raje vk patil maratha reservation maratha nashik ssh 93
Next Stories
1 नियोजनबध्द उपक्रमांमुळे पिंपळगाव ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय सन्मान
2 पर्यावरण दिनानिमित्त विविध संस्था, संघटनांकडून वृक्षारोपण
3 करोना योद्ध्यांच्या रक्षणार्थ सक्रिय पुढाकार  
Just Now!
X