05 August 2020

News Flash

‘आदर्श नाशिक’च्या संकल्पनांवर विज्ञान प्रदर्शनात झोत

सावरकर नगरमधील नवरचना विद्यालयात या दोन दिवसीय प्रदर्शनास सुरुवात झाली.

सार्वजनिक स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, सर्वसमावेशक शिक्षण, आदर्श शहरासाठी तंत्रज्ञानाचा वापर, इतिहास संग्रहालाची गरज.. अशा विविधांगी विषयांवर विद्यार्थ्यांनी ‘आदर्श नाशिक – एक वैज्ञानिक दृष्टिकोन’ या प्रदर्शनात प्रकल्पांद्वारे प्रकाशझोत टाकला. मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त मराठी विज्ञान परिषद नाशिक शाखा आणि रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्यातर्फे आयोजित प्रदर्शनाचे शनिवारी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सावरकर नगरमधील नवरचना विद्यालयात या दोन दिवसीय प्रदर्शनास सुरुवात झाली. उद्घाटन सोहळ्यास विज्ञान परिषदेचे डॉ. धनंजय आहेर, रचना माजी विद्यार्थी संघाचे कौस्तुभ मेहता, निरंजन ओक, दिगंबर गाडगीळ, मुख्याध्यापिका भारती पाटील आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आदर्श नाशिकची संकल्पना मांडण्याची संधी मिळाली. शालेय (इयत्ता सहावी ते नववी) आणि खुला (१५ वर्षांवरील सर्व) या दोन गटांत निकषांची पूर्तता करणारे ४० प्रकल्प प्रदर्शनात सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, प्लास्टिकचा वापर न करता विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने हे सर्व प्रकल्प तयार केले. उद्घाटन सोहळ्यात डॉ. धोंडगे यांनी या उपक्रमाद्वारे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यास मदत होणार असून विज्ञान दूताची भूमिका विद्यार्थी निभावत असल्याचे सांगितले. विज्ञानामुळे अनेक भेद मिटले गेले. समानता आली. त्या अनुषंगाने त्यांनी अनेक उदाहरणांचे दाखले दिले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या प्रतिभा शक्ती आणि कल्पना शक्तीला चालना मिळणार आहे. वैज्ञानिक संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचे डॉ. धोंडगे यांनी सांगितले. प्रदर्शनाचा समारोप रविवारी सायंकाळी ‘आवास’च्या सल्लागार सुलक्षणा महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी विजेत्यांना उत्कृष्ट प्रकल्प, उत्कृष्ट प्रकल्प सादरीकरण, उत्कृष्ट निष्कर्षांची उपयुक्तता असे पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रदर्शनासाठी समन्वयक म्हणून सीमा भदाणे, तरंग चिटणीस आदींनी काम पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2016 12:59 am

Web Title: science exhibition in nashik 2
Next Stories
1 डॉ. कैलास कमोद यांच्या पुस्तकांचे आज प्रकाशन
2 नाशिक महापालिकेचे १३५८ कोटींचे अंदाजपत्रक सादर
3 विविध उपक्रमांद्वारे स्वा. सावरकरांना अभिवादन
Just Now!
X