गहू कमी देणार

सरकारने आधारभूत किमतीत खरेदी केलेल्या मक्याचे काय करायचे याचे उत्तर सरकारी पातळीवर शोधण्यात आले आहे. हा मका आता रेशन दुकानातून वितरित केला जाणार आहे. अंत्योदय योजनेंतर्गत लाभाथ्र्याना गव्हात कपात करून त्याऐवजी चार किलो मका दिला जाणार आहे.

मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी विविध भागातून मका खरेदी केली होती. जिल्ह्य़ात सुमारे 38 हजार क्विंटल मका खरेदी केला आहे. त्यावेळी उत्पादकांना एक हजार 365 रुपये प्रति क्विंटल दर देण्यात आला होता. खरेदी केलेल्या मक्याचे काय करायचे? हा प्रश्ना होता. आता हा मका रेशन दुकानातून एक रुपया किलोने शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे निर्देश अन्न, नागरी पुरवठा विभागाने प्रशासनाला दिले.  त्यानुसार प्रशासनाने रेशन दुकानदारांना मका वितरण सुरू केले आहे. सरकार अंत्योदय योजनेतून सवलतीच्या दरात लाभाथ्र्याना गहू देते. गव्हात कपात करून मका दिला जाणार आहे. म्हणजे गोरगरीबांना गव्हाच्या पोळीऐवजी मक्याची भाकरी खावी लागेल. अंत्योदय योजनेतील लाभाथ्र्याना चार किलो तर प्राधान्य कुटुंबातील लाभाथ्र्याला एक किलो मका दिला जाईल. पुरवठा विभाग 25 हजार 827 क्विंटल मका रेशन दूकानांच्या माध्यमातून विकणार आहे. खरेदी केलेल्या मक्यापैकी 19 हजार 755 क्विंटल मका नऊ तालुक्यांतील रेशन दुकानांमध्ये वितरित करण्यात आला आहे. त्यात देवळा तालुक्यात 1092 क्विंटल, कळवण 1489, मालेगाव 3396, सिन्नर 2366, निफाड 3461, येवला 1835, चांदवड 1689, सटाणा 2634, नांदगाव 1158, मनमाड 721, मालेगाव 3396 क्विंटल मका वितरित झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लाभार्थी मका घेतील का?

शिधापत्रिकाधारकांना गव्हाऐवजी आता मका घ्यावा लागणार आहे. यामुळे त्यांच्या गव्हात कपात केली जाईल. अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्राधान्य कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो धान्य दिले जाते, त्यात एक किलो मका दिला जाईल, तर अंत्योदय, अन्नपूर्णा योजनेत मिळणा:या धान्यापैकी चार किलो मका घ्यावा लागणार आहे. जिल्ह्य़ात मका पिकवला जातो. मात्र तो तितकासा खाल्ला जात नाही. आदिवासी भागातील नागरिकांचे भात, नागली हे प्रमुख अन्न आहे. या स्थितीत शिधावाटप दुकानातून दिला जाणारा मका शिधापत्रिकाधारक घेतील का याबद्दल साशंकता आहे.