News Flash

कोरडय़ा गोदापात्रात तुषार सिंचन व्यवस्था; कोपरगावात सोमवारी पुष्कर शाही स्नान

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात बेट भागात पूर्वी पुष्कर शाही स्नानाची परंपरा होती.

बेटातील श्री शुक्राचार्य महाराज मंदिर समितीच्या वतीने सिंहस्थ कुंभपर्व श्रावण मासानिमित्त सोमवारी सकाळी कोपरगाव येथे गोदावरी नदीवर पुष्कर शाही स्नान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवानंद सरस्वती महाराज (नाशिक), जंगलीदास माउली (कोकमठाण), रमेशगिरी महाराज, शिवभक्त अरविंद महाराज व अन्य साधू, महंत या सोहळय़ास उपस्थित राहणार आहेत. देवस्थानचे अध्यक्ष ए. एल. कुलकर्णी व सचिव बाळासाहेब आव्हाड यांनी ही माहिती दिली. या वेळी सचिन परदेशी, व्यवस्थापक संजय वडांगळे आदी या वेळी उपस्थित होते.

कुलकर्णी व आव्हाड यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात बेट भागात पूर्वी पुष्कर शाही स्नानाची परंपरा होती. ती खंडित झाली होती. यानिमित्ताने यंदा ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून या शाही स्नानासाठी गोदावरी नदीपात्राची स्वच्छता व घाट वजा पायऱ्या तयार करून दिल्या आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजता बेट भागातील शुक्राचार्य मंदिरापासून तीन सजवलेल्या पालख्यांचे पूजन करून साधुसंतांसह शाही सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 11:14 am

Web Title: shahi bath in kopargaon
Next Stories
1 शाही मार्गावरून मिरवणूक काढल्याने साधूसंतप्त
2 पोलिसांच्या कार्यपध्दतीविषयी बहुतांश भाविक समाधानी
3 शाही पर्वणीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठीच कडेकोट बंदोबस्त
Just Now!
X