News Flash

भुजबळ करोना काळजी केंद्राचे आज शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

१८० प्राणवायू सुविधायुक्त खाटांसह चित्रपट, आयपीएल सामने पाहण्याची रूग्णांसाठी व्यवस्था

१८० प्राणवायू सुविधायुक्त खाटांसह चित्रपट, आयपीएल सामने पाहण्याची रूग्णांसाठी व्यवस्था

नाशिक : प्राणवायू सुविधायुक्त खाटा, थंड हवेची सोय, अंडी, फळांचा रस, हळदयुक्त दूध, विरंगुळ्यासाठी बुध्दिबळ, कॅ रम, करमणुकीसाठी चित्रपट, आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण ही सर्व व्यवस्था असलेल्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलातील भुजबळ करोना काळजी के ंद्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाइन उदघाटन होणार आहे.

महानगरपालिका आणि मेट भुजबळ नॉलेज सिटी यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या मदतीने हे केंद्र तयार करण्यात आले असून त्यात १८०  प्राणवायू सुविधायुक्त खाटांसह इतर ११५ अशा एकूण २९५ खाटांची व्यवस्था आहे.  रूग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने शहरातील रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत. प्राणवायू आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या खाटा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांचा  ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या करोना के ंद्राचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. के ंद्रात १८० खाटांसाठी प्राणवायू वाहिनीची  स्वतंत्र जोडणी केलेली आहे. त्यासाठी डय़ुरा सिलिंडर वेल्लूर (कर्नाटक )येथून आणण्यात  आले आहेत. पुरेशा प्राणवायू  साठय़ासाठी आवश्यक क्षमतेचे टँक पुण्याहून आणण्यात आले आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी दिल्ली येथून ५० एअरकुलर आणण्यात आले आहेत.

भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून चिकित्सक  डॉ.अभिनंदन जाधव यांच्यासह १० डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी डॉक्टर विभागाचे डॉक्टर तसेच  नाशिकमधील डॉ. शितल गुप्ता आणि डॉ. अतुल वडगांवकर यांचेही सहकार्य लाभणार आहे. रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक  जेवण, अंडी आणि  नाश्ता, फळांचा रस, चहा, रात्रीचे हळदयुक्त दूध, शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय, बुद्धिबळ, कॅरम आदी खेळ, कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था, दोन दूरदर्शन संच अशा सोयी—सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मोठय़ा पडद्यावर सकाळी योगा आणि प्राणायामचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट, सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आयपीएल क्रिकेटचे सामने दाखविण्यात येणार आहे. रूग्णाचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी व्हावा आणि आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत व्हावी, हा यामागील हेतू असल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 1:43 am

Web Title: sharad pawar inaugurate bhujbal corona care center today zws 70
Next Stories
1 चाडेगाव शिवारात बिबटय़ा जेरबंद
2 वालदेवी धरणात बुडालेल्या सहाही जणांच्या मृतदेहांचा शोध
3 नाशिककरांसाठी आता १ हजार २५० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रे्टर’
Just Now!
X