News Flash

दाखलेबाज गुंड भाजपमध्ये

भाजपने नैतिकता सोडल्याची शिवसेनेची टीका

नाशिकमध्ये पवन पवार अटलबंधना; भाजपने नैतिकता सोडल्याची शिवसेनेची टीका

महापालिकेच्या मागील निवडणूक प्रचारात राष्ट्रवादीवर गुंडगिरीच्या मुद्दय़ावरून तोंडसुख घेणाऱ्या भाजपने आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, पोलिसाचा खून आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या नगरसेवक पवन पवारला पक्षात प्रवेश देऊन भाजपही इतरांसारखाच आहे, आमच्यात कोणतेही वेगळेपण नाही हे दाखवून दिले आहे. या प्रश्नावर गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री यांची भूमिका काय, असा प्रश्न नाशिककरांकडून केला जात आहे.

अवघ्या काही महिन्यांवर आलेली महापालिका निवडणूक भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे. यामुळे सध्या दोन्ही पक्षांमध्ये मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीमधून नगरसेवक आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत भाजपने गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या नगरसेवकालाही प्रवेश दिल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिका पोटनिवडणुकीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात भाजपचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत अपक्ष नगरसेवक तथा नाशिक रोड प्रभाग समितीचा माजी सभापती पवन पवारचा प्रवेश झाला.   राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली वावरणाऱ्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या मंडळींनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यासाठी धडपड सुरू केली. त्यात ते यशस्वी झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

पवन पवारवर २२ गुन्हे

  • नाशिक रोड भागात पवारची दहशत आहे. काही वर्षांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याच्या खूनप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
  • व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याचे दोन गुन्हे त्याच्यावर आहेत.
  • शहरातील विविध पोलीस ठाण्यांत पवारविरुध्द २२ गुन्हे दाखल आहेत.
  • मध्यंतरी पोलिसांनी त्याला तडीपारही केले होते. दीड महिन्यापूर्वी पवारच्या संपर्क कार्यालयात तडीपार गुंडाला आश्रय दिल्याचे उघड झाले. त्या प्रकरणातही त्याला अटक झाली.

सत्तेच्या मोहापायी भाजपने नीतिमत्ता सोडली असून ते कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. चार महिन्यांपासून पवन पवार सेनेत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत होता; तथापि गुन्हेगारी मंडळींना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असे सेनेने निश्चित केले होते. पवारला प्रवेश देऊन भाजपने खून, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्यांना पक्षात मुक्तद्वार असल्याचे दाखवले आहे.

आ. अजय चौधरी संपर्कप्रमुख, शिवसेना

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 12:57 am

Web Title: shiv sena comment on bjp over pawan pawar
Next Stories
1 जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या दर्जाबाबत तडजोड नाही – राम शिंदे
2 नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन
3 रितिकाला तिहेरी मुकुट
Just Now!
X