शिवसेनेची आयुक्तांकडे तक्रार

न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर राज्य शासनाने अनधिकृतपणे बांधकाम केलेली तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविण्यात येत असून त्याअंतर्गत शहरात महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. उद्यान, खुली जागा व स्थानिकांनी लोकवर्गणीतून निर्माण केलेल्या खासगी जागेतील धार्मिक स्थळांनाही नोटीस बजावण्यात आल्या असून कारवाईदेखील होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांकडे केली आहे. आहे. काही कालावधीसाठी ही मोहीम स्थगित करावी तसेच धार्मिक स्थळे अधिकृत करण्यासाठी महासभेत धोरण ठरविण्यात यावे, धार्मिक स्थळांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Uddhav thackeray
हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचा संघर्ष; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्ला
Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. शहरातील धार्मिक स्थळे भावनिक प्रश्न असून खऱ्या अर्थाने वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, वैयक्तिक मालमत्तेवर अतिक्रमण किंवा सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणारी बांधकामे हटविण्यास शिवसेनेचा विरोध नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. मागील काही दिवसात उद्यान, खुली जागा व स्थानिकांनी लोकवर्गणीतून निर्माण केलेल्या खासगी जागेतील धार्मिक स्थळांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कारवाई देखील सुरू आहे. मनपाच्या नियोजनानुसार खुल्या जागेत १० टक्के बांधकाम अनुज्ञेय आहे. तसेच असलेली धार्मिक स्थळेही नियमात असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या आराखडय़ात खुली जागा आहे. त्या जागेचा वापर कोणत्या प्रयोजनासाठी करावयाचा याचा पूर्णत: अधिकार आराखडाधारकांचा आहे. (उदा. व्यायामशाळा बांधणे, उद्यान विकसित करणे, क्रीडांगण, अभ्यासिका अथवा जागा मोकळी ठेवणे) नाशिकमधील बहुतांशी धार्मिक स्थळे स्थानिकांनी लोकवर्गणीतून बांधलेली आहेत. यातील अनेक धार्मिक स्थळांना लोकप्रतिनिधींच्या निधीतून सभा मंडप बांधण्यात आले असल्याचेही शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, माजी उपमहानगरप्रमुख सुदाम डेमसे, शिवसेना विभागप्रमुख गणेश जाधव आदी उपस्थित होते.

दरम्यान, धार्मिक स्थळांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेविरोधात शिवसेनेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी आपापल्या धार्मिक स्थळांची कागदपत्रे त्वरित शालिमारच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.